Flood Victims : पाईपलाईन रोड येथील ए एम सेरेनिया अपार्टमेंटच्या वतीने पूरग्रस्तांना एक लाख 52 हजार 111 रुपयांची मदत

Flood Victims : पाईपलाईन रोड येथील ए एम सेरेनिया अपार्टमेंटच्या वतीने पूरग्रस्तांना एक लाख 52 हजार 111 रुपयांची मदत

0
Flood Victims : पाईपलाईन रोड येथील ए एम सेरेनिया अपार्टमेंटच्या वतीने पूरग्रस्तांना एक लाख 52 हजार 111 रुपयांची मदत
Flood Victims : पाईपलाईन रोड येथील ए एम सेरेनिया अपार्टमेंटच्या वतीने पूरग्रस्तांना एक लाख 52 हजार 111 रुपयांची मदत

एकमेकांच्या मदतीला धावून जाणे ही महाराष्ट्राची संस्कृती – आमदार संग्राम जगताप

Sangram Jagtap : नगर : महाराष्ट्र राज्यासह मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाने (Heavy Rain) थैमान घातले असल्यामुळे महापुरामध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले, याचबरोबर संसार उपयोगी वस्तू वाहून गेल्या त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले, आपण समाजामध्ये वावरत असताना समाजाचे काहीतरी देणे लागते, या भावनेतून ए एम सेरेनिया अपार्टमेंटमधील कुटुंबियांनी एकत्रित येत सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत आपले कर्तव्य पार पाडले, एकमेकांच्या मदतीला धावून जाणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, पूरग्रस्तांना (Flood Victims) संकट काळातून बाहेर काढण्याचे काम आपल्या सर्वांना करावे लागणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले.

अवश्य वाचा: सीना नदी पुलाच्या अर्धवट व चुकीच्या कामामुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात

मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त

पाईपलाईन रोड येथील ए एम सेरेनिया अपार्टमेंटच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख 52 हजार 111 रुपयाचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त करताना आमदार संग्राम जगताप समवेत प्रितेश शहा, राजेश गुगळे, सचिन ओस्तवाल, सुदीप अग्रवाल, रमेश जाधव, दिलीप दाते, साहिल ओस्तवाल, बाळासाहेब शेटे, प्रताप काळे, दीपक देशमुख आदी उपस्थित होते.

नक्की वाचा : आमदार संग्राम जगताप यांचा कोतवाली पोलीस ठाण्यात ठिय्या

नागरिकांना पुढे येऊन पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन (Flood Victims)

सावेडी पाईपलाईन रोड येथील ए एम सेरेनिया अपार्टमेंट मध्ये 52 कुटुंब राहत असून सोसायटीला पूरग्रस्तांसाठी मदतीचे आव्हान केले असता रहिवाशांनी तातडीने एक लाख 52 हजार 111 रुपयाचा निधी गोळा केला आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे धनादेश सुपूर्त केला तरी अहिल्यानगर शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने पुढे येऊन पूरग्रस्तांना मदत करावी असे आवाहन राजेश गुगळे यांनी केले.

आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांच्याकडे धनादेश सुपूर्त केला असून मदत ही प्रसिद्धीसाठी केली नसून त्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती होईल व मोठ्या प्रमाणात नागरिक पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे येतील अशी भावना रमेश जाधव यांनी व्यक्त केली.