Flyover : उड्डाणपुलाचे भूमिपूजन म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार : याेगीराज गाडे 

Flyover : उड्डाणपुलाचे भूमिपूजन म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार : याेगीराज गाडे 

0
Flyover

Flyover : नगर : नगरमध्ये नुकतेच सत्ताधाऱ्यांकडून तीन उड्डाणपुलाचे माेठा गाजावाजा करत भूमिपूजन करण्यात आले. परंतु, वास्तविकता अशी आहे की, अद्यापही या कामासाठी काेणतेही वर्क ऑर्डर (Work Order) जारी झालेली नाही. तसेच टेंडरही निघालेले नाही. कायद्याने वर्क ऑर्डर आणि टेंडर निघाल्याशिवाय काेणत्याही कामाचे भूमिपूजन करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे भूमिपूजन म्हणजे जनेतची केवळ दिशाभूल करण्याचा प्रकार असल्याचा आराेप माजी नगरसेवक याेगीराज गाडे (Yagiraj Gade) यांनी केला आहे. 

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन (Flyover)

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थसंकल्पतंर्गत मंजूर झालेल्या शहरातील नगर-कोल्हार-शिर्डी रस्त्यावरील डीएसपी चौक उड्डाणपुल, नागापुर एमआयडीसी जवळील सह्याद्री चौक व सनफार्मा चौक या तीन उड्डाणपुलांच्या कामांचे भूमिपूजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते करण्यात आले. सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नातून डीएसपी चौक (रुपये ७१ कोटी) व सह्याद्री चौक (रुपये ५१ कोटी) येथील उड्डाणपुलांच्या बांधकामासाठी भूमिपुजन समारंभाचे आयोजन करण्यात आले हाेते. परंतु, कायद्यानुसार वर्क ऑर्डर आणि टेंडर निघाल्याशिवाय कोणत्याही बांधकामाचे भूमिपूजन समारंभ करणे हे अवैध आहे. जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि संबंधित प्राधिकरणांनी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती माजी नगरसेवक गाडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here