Food and Drug Administration’s : अहिल्यानगर शहरात अन्न व औषध प्रशासनाची भेसळयुक्त कुल्फीविरोधात कारवाई

Food and Drug Administration's : अहिल्यानगर शहरात अन्न व औषध प्रशासनाची भेसळयुक्त कुल्फीविरोधात कारवाई

0
Food and Drug Administration's : अहिल्यानगर शहरात अन्न व औषध प्रशासनाची भेसळयुक्त कुल्फीविरोधात कारवाई
Food and Drug Administration's : अहिल्यानगर शहरात अन्न व औषध प्रशासनाची भेसळयुक्त कुल्फीविरोधात कारवाई

Food and Drug Administration’s : नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) येथे अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration’s) भेसळयुक्त कुल्फीविरोधात मोठी कारवाई केली आहे. शहरातील विविध ठिकाणी तपासणी करताना एका नामांकित कंपनीच्या ब्रँडच्या कुल्फीमध्ये (Kulfi) नियमबाह्य घटकांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी नमुने गोळा करून तब्बल एक हजार ८५६ पॅकेट्स कुल्फीचा साठा जप्त केला असून, या साठ्याची किंमत सुमारे ५५ हजार ६८० रुपये आहे.

नक्की वाचा : देवदैठण येथे बाप-लेक पाण्यात बुडाले; मुलाला वाचवण्यात यश तर वडिलांचा मृत्यू

या प्रकरणाची गंभीर दखल

अन्नसुरक्षा आणि मानके कायद्यानुसार आईस्क्रीम आणि कुल्फीसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये कोणत्याही प्रकारचे वनस्पती तेल किंवा फॅट वापरण्यास सक्त मनाई आहे. मात्र, तपासणीदरम्यान अमुल कंपनीमार्फत वितरित होणाऱ्या काही कुल्फी उत्पादनांमध्ये अशा घटकांचा वापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित कंपनीकडून खुलासा मागविण्यात आला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

तपासणी मोहीम राबविण्यात येणार (Food and Drug Administration’s)

ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी रा. ना. बडे आणि कि. ध. जगदाळे यांनी सहायक आयुक्त ग. वि. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील अमुलच्या इतर अधिकृत वितरकांकडेही तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.