Football : फुटबाॅल खेळ रुजवण्यासाठी गाॅडविन डिक यांचे माेलाचे याेगदान ः नरेंद्र फिराेदिया

Football : फुटबाॅल खेळ रुजवण्यासाठी गाॅडविन डिक यांचे माेलाचे याेगदान ः नरेंद्र फिराेदिया

0
Football

Football : नगर : शहरात फुटबॉल (Football) खेळ रुजवण्यासाठी गॉडविन डिक (Godwin Dick) यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांच्यामुळे या खेळाला चालना मिळाली आहे, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी केले. तसेच स्पर्धेसाठी खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या. 

football
xr:d:DAF5Y3epXKI:865,j:6099423515169201490,t:24040314

नक्की वाचा: नगरकरांवर पाणी कपातीचे संकट

फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमीतर्फे आयाेजन (Football)

शहरातील दिवंगत फुटबॉल खेळाडू गॉडविन डिक यांचा स्मरणार्थ फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमीतर्फे गॉडविन कप ९ अ साइड फुटबॉल स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले हाेते. या स्पर्धेचे उद्घाटन अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते झाले. यावेळी उपाध्यक्ष खालिद सय्यद, खजिनदार जोगासिंह मिनास, सहसचिव विक्टर जोसेफ, ऋषपालसिंग परमार, जेव्हिअर स्वामी, राजेश अँथनी, जॉय जोसेफ, प्रदीप जाधव, राजू पाटोळे आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या प्रारंभी गॉडविन डिक यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन उपस्थित पाहुणे व खेळाडूंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. फिरोदिया यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. प्रास्ताविकात विक्टर जोसेफ म्हणाले की, ”गॉडविन डिक यांनी आपल्या आयुष्यात अनेक फुटबॉलपटू घडवण्याचे काम केले. त्यांच्या स्मरणार्थ नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे स्पष्ट केले. जेव्हिअर स्वामी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रदीप जाधव यांनी स्व. गॉडविन डिक हे खेळाडूवृत्तीने जीवन जगले. फुटबॉलसाठी त्यांचे अतुलनीय समर्पण सर्वांना प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले.

Football

हे देखील वाचा: सुप्याच्या एमआयडीसीत खंडणी बहाद्दर गोळा झालेत – राधाकृष्ण विखे पाटील

शहरातील १२ फुटबॉल संघांचा सहभाग (Football)

फुटबाॅल स्पर्धेचा थरार भुईकोट किल्ला येथील मैदानात फुटबॉल स्पर्धेच्या थरारला प्रारंभ झाला असून, सहा दिवसीय फुटबॉल स्पर्धा रंगणार आहे. यामध्ये शहरातील १२ फुटबॉल संघांनी सहभाग नोंदवला आहे. पहिला सामना आर्ककॉन विरुद्ध बाटा एफसी यांच्यात झाला. यामध्ये आर्ककॉनने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन ३-१ गुणांनी स्कोअरलाइनसह विजय मिळवला. ही स्पर्धा डिक कुटुंबीय आणि अहदमनगर डिस्ट्रीक्ट फुटबॉल असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. नॉकआऊट पद्धतीने सर्व सामने होणार आहे. दररोज २ सामन्यांचे नियोजन करण्यात आले आहे. अंतिम सामना ७ एप्रिल रोजी रंगणार आहे. यामधील विजेत्या संघास ९ हजार रुपये रोख व चषक, उपविजयी संघास ५ हजार रुपये रोख व चषक प्रदान केले जाणार आहे.

Football
xr:d:DAF5Y3epXKI:864,j:3774440207677242553,t:24040314

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here