Football : प्रशिक्षणाच्या माध्यमातून घडणार उत्तम फुटबॉल प्रशिक्षक : नरेंद्र फिराेदिया

Football : प्रशिक्षणाच्या माध्यमातून घडणार उत्तम फुटबॉल प्रशिक्षक : नरेंद्र फिराेदिया

0
Football : प्रशिक्षणाच्या माध्यमातून घडणार उत्तम फुटबॉल प्रशिक्षक : नरेंद्र फिराेदिया
Football : प्रशिक्षणाच्या माध्यमातून घडणार उत्तम फुटबॉल प्रशिक्षक : नरेंद्र फिराेदिया

Football : नगर : फुटबॉल (Football) खेळाचा प्रशिक्षक (Coach) होण्यासाठी डी परवाना शिबिराच्या माध्यमातून खेळाडूंना एक चांगली संधी मिळाली आहे. चांगले फुटबॉल खेळाडू घडविण्यासाठी चांगले प्रशिक्षक देखील निर्माण होण्याची गरज आहे. फुटबॉल प्रशिक्षक या खेळाचा कणा आहे. फुटबॉल खेळाचा विकास व्हावा, या एकच भावनेने अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन कार्य करत आहे. या शिबिराच्या माध्यमातून खेळाडूंना घडविण्यासाठी उत्तमप्रकारे प्रशिक्षकांना मार्गदर्शन केले जाणार आहे, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिराेदिया (Narendra Firodia) यांनी केले. 

नक्की वाचा: महारक्तदान शिबिराची दखल देशपातळीवर घेतली जात आहे : संग्राम जगताप

फुटबॉल प्रशिक्षक होण्यासाठी पाच दिवसीय शिबिर

अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनतर्फे अधिकृत फुटबॉल प्रशिक्षक होण्यासाठी शहरात आयोजित केलेल्या डी परवाना शिबिराचे उद्घाटन असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते झाले. फुटबॉल प्रशिक्षक घडवण्यासाठी पहिल्यांदाच ऑल इंडिया व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने पाच दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या उद्घाटन सोहळ्यासाठी असोसिएशनचे खजिनदार राणा परमार, सचिव रॉनप फर्नांडिस, सहसचिव प्रदीपकुमार जाधव, विक्टर जोसेफ, अहमदनगर महाविद्यालयाचे फिजीकल डायरेक्टर सॅविओ वेगास, उपप्राचार्य डॉ. नोएल पारघे, शहर बँकेचे संचालक प्रा. माणिक विधाते, ऑल इंडिया फुटबॉल असोसिएशनचे एज्युकेटर कोच सलीम पठाण, उपाध्यक्ष खालिद सय्यद, सहखजिनदार रणबीरसिंह परमार, कार्यकारिणी सदस्य पल्लवी सैंदाणे, राजू पाटोळे, जेव्हिअर स्वामी, रमेश परदेशी, जोनाथन जॉय आदींसह प्रशिक्षणार्थी खेळाडू उपस्थित होते.

अवश्य वाचा: नगरमध्ये नरेंद्रजी फिरोदिया अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धा; देशभरातील खेळाडूंचा राहणार सहभाग

सलीम पठाण म्हणाले, (Football)

 ”खेळाडूंनी आपले पॅशन करिअरमध्ये उतरवावे, यामुळे जीवनाचा खरा आनंद लुटता येणार आहे. फुटबॉल हा सर्वोत्तम खेळ असून, युवक-युवतींसाठी एक चांगले करिअर म्हणून या खेळाकडे पाहण्याची गरज आहे. खेळाडूंनी व प्रशिक्षकांनी या खेळाचे तंत्रशुद्ध माहिती व ज्ञान आत्मसात करण्याचे त्यांनी आवाहन केले. अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर २१ जुलैपर्यंत प्रशिक्षण चालणार आहे. डी परवाना शिबिराला युवकांसह युवतींचा देखील प्रतिसाद मिळाला आहे. शिबिरासाठी असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर व अहमदनगर महाविद्यालयाचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. यामध्ये ऑल इंडिया फुटबॉल असोसिएशनचे एज्युकेटर कोच सलीम पठाण शिबिरार्थी प्रशिक्षकांना खेळातील नियम, अटी, खेळातील बारकावे, गुण पद्धती, खेळाडूंमध्ये कौशल्य निर्माण करणे आदी फुटबॉल खेळाशी संबंधित मार्गदर्शन करणार आहे. प्रास्ताविक रॉनप फर्नांडिस यांनी केले. प्रदीपकुमार जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here