Football Selection Test : भुईकोट किल्ला मैदानात सोमवारपासून रंगणार फुटबॉल निवड चाचणी

Football Selection Test : भुईकोट किल्ला मैदानात सोमवारपासून रंगणार फुटबॉल निवड चाचणी

0
Football Selection Test : भुईकोट किल्ला मैदानात सोमवारपासून रंगणार फुटबॉल निवड चाचणी
Football Selection Test : भुईकोट किल्ला मैदानात सोमवारपासून रंगणार फुटबॉल निवड चाचणी

Football Selection Test : नगर : महाराष्ट्र राज्य ज्युनियर आंतर जिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप (Football Championship) (१५ वर्षांखालील) फुटबॉल स्पर्धेसाठी नगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनतर्फे जिल्हा निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. भुईकोट किल्ला मैदान येथे सोमवारी (ता. २१) पासून निवड चाचणीला प्रारंभ होणार आहे. या निवड चाचणीद्वारे (Football Selection Test) जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे. या निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी फुटबॉल (Football) संघ व खेळाडूंना सीआरएस नोंदणी करुन सहभागी होण्याचे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

अवश्य वाचा: मी स्वत: मराठा समाजाला आरक्षण देणार : एकनाथ शिंदे

१८ खेळाडूंची संघात होणार निवड

फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड चाचणी होणार आहे. असोसिएशनचे सचिव रौनप फर्नांडिस यांच्या उपस्थितीमध्ये १८ खेळाडूंची संघात निवड होणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये तज्ज्ञ फुटबॉल प्रशिक्षक खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत. निवड झालेला जिल्ह्याचा संघ शिरपूर (धुळे) येथे ५ ते १० नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी रवाना होणार आहे.

नक्की वाचा: आचारसंहिता म्हणजे काय? वाचा,आचारसंहितेचे नियम

सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्‍यक (Football Selection Test)

यामध्ये १ जानेवारी २०१० नंतर किंवा ३१ डिसेंबर २०११ च्या पूर्वी जन्मलेल्या खेळाडूंना सहभागी होता येणार आहे. निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्‍यक आहे. सीआरएस नोंदणी न केलेल्या खेळाडूंना निवड चाचणीत खेळता येणार नाही.. खेळाडूंना त्यांचा मूळ जन्म प्रमाणपत्र आणि सोबत आधारकार्ड, पासपोर्ट आणणे आवश्‍यक आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जेव्हिअर स्वामी, तर सहाय्यक प्रशिक्षक वैभव मनोदिया राहणार आहे. निवड चाचणी यशस्वी करण्यासाठी राजू पाटोळे, प्रदीप जाधव, व्हिक्टर जोसेफ प्रयत्नशील आहेत.