Football tournament : ॲलेक्स चषक फुटबॉल स्पर्धेत फिरोदिया शिवाजीयन्स विजयी; भिंगार येथील सेंट जॉन्स चर्चच्या मैदानावर रंगला होता फुटबॉल स्पर्धेचा थरार

Football tournament : ॲलेक्स चषक फुटबॉल स्पर्धेत फिरोदिया शिवाजीयन्स विजयी; भिंगार येथील सेंट जॉन्स चर्चच्या मैदानावर रंगला होता फुटबॉल स्पर्धेचा थरार

0
Football tournament

Football tournament : नगर : भिंगार येथील सेंट जॉन्स चर्चतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सिक्स-ए-साइड ॲलेक्स चषक फुटबॉल स्पर्धेत (Football tournament) फिरोदिया-शिवाजीयन्सने (Firodia-Shivajians) बाटा एफसी (Bata FC) विरुद्ध टायब्रेकरमध्ये निर्णायक ३-१ने विजय मिळवला.

हे देखील वाचा : नीलेश लंके म्हणाले, अजून काही ठरलं नाही

विविध संघातील खेळाडूंचे उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन (Football tournament)

सेंट जॉन्स चर्चच्या मैदानावर दोन दिवसीय फुटबॉल स्पर्धेचा थरार रंगला होता. विविध संघातील खेळाडूंनी कौशल्यपणाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये बाटा एफसीचे फहीम शेख आणि कामरान पेनल्टी स्पॉटवरून गोल करण्यास अपयशी ठरले, तर केवळ आदित्य भिंगारदिवे गोल करण्यात यशस्वी झाले. रोशन रिकामे आणि रोनक जाधव यांनी गोल केल्याने फिरोदिया शिवाजीयन्सने दणदणीत विजय मिळवला. फिरोदिया शिवाजीयन्सचे रोशन रिकामे आणि बाटा एफसीचे ऋषी पाटोळे या दोघांना स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले.

नक्की वाचा : लाेकसभा निवडणुका डाेळ्यासमाेर ठेवून ईडीकडून जाणून बुजून कारवाई; शरद पवार यांची टीका

१६ संघांचा सहभाग होता (Football tournament)

या स्पर्धेत १६ संघांचा सहभाग होता. ॲलेक्स कप आयोजन समितीचे अध्यक्ष फादर विश्‍वास परेरा व अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष खालिद सय्यद यांच्या हस्ते विजेता, उपविजेत्या व तृतीय क्रमांकाच्या संघांना पुरस्कार वितरण करण्यात आले. फादर पेरेरा यांनी खेळाडूंच्या उत्कृष्ट खेळाचे कौतुक केले. या स्पर्धेतील विजेत्या संघाचे ‘आय लव्ह नगर’चे संस्थापक तथा उद्याेजक नरेंद्र फिरोदिया, जोगासिंग मिनहास, राणा परमार, मनोज वाळवेकर यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी फर्नांडिस कुटुंबियांचे विशेष योगदान लाभले. रोनप फर्नांडिस, वोहमिया फर्नांडिस, अनिता परेरा यांनी स्पर्धेसाठी सहकार्य केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कार्यकारिणी सदस्या पल्लवी सैदाणे, व्हिक्टर जोसेफ, जेव्हिअर स्वामी, जॉय जोसेफ, राजेश अँथनी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here