Football tournament : ‘फिराेदिया शिवाजीयन्स’ फुटबाॅल स्पर्धा; आज रंगला अनिर्णित सामन्यांचा खेळ

Football tournament : 'फिराेदिया शिवाजीयन्स' फुटबाॅल स्पर्धा; आज रंगला अनिर्णित सामन्यांचा खेळ

0
Football tournament

Football tournament : नगर : फिरोदिया शिवाजीयन्स (Firodia Shivajians) इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत (Football tournament) शनिवारी (ता. २८) अनिर्णित सामन्यांचा खेळ रंगला होता. तुल्यबळ संघ एकमेकांना भिडल्याने शेवटपर्यंत फुटबॉल सामने (Football matches) निर्णायक ठरले. यात झालेल्या पाच सामन्यांपैकी तीन सामन्यात दोन्ही संघांकडून एकही गोल न झाल्याने तिन्ही सामने अनिर्णित राहिले. तर उर्वरीत दोन सामन्यात ओऍसीस इंग्लिश मीडियम स्कूल व आठरे पाटील स्कूलच्या संघांनी विजय मिळवला.

Football tournament : 'फिराेदिया शिवाजीयन्स' फुटबाॅल स्पर्धा; आज रंगला अनिर्णित सामन्यांचा खेळ
Football tournament : ‘फिराेदिया शिवाजीयन्स’ फुटबाॅल स्पर्धा; आज रंगला अनिर्णित सामन्यांचा खेळ

नक्की वाचा: भाऊबीजेच्या ओवाळणीपासून एकही बहीण वंचित राहणार नाही; देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

०-१ गोलने ओऍसीस स्कूलचा संघ विजयी

१४ वर्ष वयोगटात डॉन बॉस्को विरुद्ध प्रियदर्शनी स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. यामध्ये शेवटपर्यंत दोन्ही संघाला एकही गोल करता आला नाही. ०-० गोलने हा सामना अनिर्णित राहिला. दुसरा सामना अशोकभाऊ फिरोदिया विरुद्ध ओऍसीस इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यात झाला. यामध्ये पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघाकडून एकही गोल झाला नाही. सेकंड हाफमध्ये ओऍसीस इंग्लिश मीडियम स्कूलचा ओम पवार याने १ गोल करुन विजय खेचून आणला. ०-१ गोलने ओऍसीस इंग्लिश मीडियम स्कूलचा संघ विजयी झाला.

अवश्य वाचा: नगर शहरासाठी लवकरच ४० इलेक्ट्रिक बसेस – नीलेश लंके

७-१ गोलने आठरे पाटील स्कूलचा संघ विजयी (Football tournament)

आठरे पाटील स्कूल विरुद्ध ओऍसीस इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात आठरे पाटील स्कूलच्या खेळाडूंनी दमदार खेळी करुन प्रतिस्पर्धी संघावर तब्बल ७ गोल केले. आठरे पाटील कडून अशोक चंद व सारंग पाथ याने प्रत्येकी २ गोल, तर साई गोलांडे व ओम लोखंडे याने प्रत्येकी १ गोल केला. तर ओऍसीस इंग्लिश मीडियमकडून शिवम याला एकमेव गोल करता आला. ७-१ गोलने आठरे पाटील स्कूलचा संघ विजयी झाला. १२ वर्ष वयोगटात ओऍसीस इंग्लिश मीडियम स्कूल विरुद्ध तक्षीला यांच्यात झालेला सामना शेवटपर्यंत निर्णायक राहिला. यामध्ये उत्कृष्ट खेळी करुनही संघांना गोल करण्यात यश आले नाही. शेवटी ०-० गोल हा सामना अनिर्णित राहिला. ऑक्झिलियम कॉन्व्हेंट विरुद्ध आर्मी पब्लिक स्कूल (एमआयसीएस) यांच्यातील सामना देखील शेवटपर्यंत गोल न झाल्याने ०-० ने अनिर्णित राहिला.