Football tournament : ‘फिरोदिया शिवाजीयन्स’ फुटबॉल स्पर्धा; उपान्त्य फेरीतील थरारक सामन्यांनी वेधले लक्ष

Football tournament : 'फिरोदिया शिवाजीयन्स' फुटबॉल स्पर्धा; उपान्त्य फेरीतील थरारक सामन्यांनी वेधले लक्ष

0
Football tournament : 'फिरोदिया शिवाजीयन्स' फुटबॉल स्पर्धा; उपान्त्य फेरीतील थरारक सामन्यांनी वेधले लक्ष
Football tournament : 'फिरोदिया शिवाजीयन्स' फुटबॉल स्पर्धा; उपान्त्य फेरीतील थरारक सामन्यांनी वेधले लक्ष

Football tournament : नगर : फिरोदिया शिवाजीयन्स (Firodia Shivajians) इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत (Football tournament) बुधवारी (ता. २) मुलांच्या गटातील उपान्त्य फेरीचे थरारक सामने रंगले होते. तुल्यबळ संघ अंतिम फेरी गाठण्यासाठी एकमेकांना भिडले होते. या रंगतदार सामन्या विजयी झालेले संघ शनिवारी (ता. ५) नगर महाविद्यालयाच्या मैदानावर अंतिम सामन्यात (Final match) खेळणार आहे.

Football tournament : 'फिरोदिया शिवाजीयन्स' फुटबॉल स्पर्धा; उपान्त्य फेरीतील थरारक सामन्यांनी वेधले लक्ष
Football tournament : ‘फिरोदिया शिवाजीयन्स’ फुटबॉल स्पर्धा; उपान्त्य फेरीतील थरारक सामन्यांनी वेधले लक्ष

नक्की वाचा: दुर्गामाता दौडीत नारीलाच नाकारले,संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

यांच्यात होणार अंतिम सामना

अंतिम सामना १२ वर्ष वयोगट प्रवरा पब्लिक स्कूल विरुद्ध आठरे पाटील पब्लिक स्कूल, १४ वर्ष वयोगट आठरे पाटील पब्लिक स्कूल विरुद्ध आर्मी पब्लिक स्कूल (एसीसी ॲण्ड एस), १६ वर्ष वयोगट आठरे पाटील पब्लिक स्कूल विरुद्ध आर्मी पब्लिक स्कूल (एसीसी ॲण्ड एस), १७ वर्षा आतील मुलींच्या संघात आठरे पाटील पब्लिक स्कूल विरुद्ध आर्मी पब्लिक स्कूल (एसीसी ॲण्ड एस) यांच्यात होणार आहे. उपान्त्य फेरीच्या सामन्यात १२ वर्ष वयोगटात प्रवरा पब्लिक स्कूल विरुद्ध तक्षिला स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये प्रवरा पब्लिक स्कूलने दमदार खेळी करुन तब्बल ७ गोल केले. यामध्ये जतीन ने सर्वाधिक ४ गोल केले. तर जयवर्धन याने २ व धीरज याने १ गोल केला. प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करता आला नाही. ७-० गोलने प्रवरा पब्लिक स्कूलने विजय मिळवला.

अवश्य वाचा: पुण्यात दोन चिमुरड्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार

०-२ गोलने आठरे पाटील पब्लिक स्कूल विजयी (Football tournament)

आठरे पाटील पब्लिक स्कूल विरुद्ध आर्मी पब्लिक स्कूल (एसीसी ॲण्ड एस) यांच्यात झालेल्या सामन्यात आठरे पाटीलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला. यामध्ये आर्यन टेमघरे व विवेक पाटील याने प्रत्येकी १ गोल करुन विजय निश्‍चित केला. प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करता आला नाही. ०-२ गोलने आठरे पाटील पब्लिक स्कूलने विजय मिळवला.


१४ वर्ष वयोगटात सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट स्कूल विरुद्ध आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये अटीतटीचा सामना शेवटपर्यंत रंगला होता. यामध्ये अशोक चांद याने १ गोल करुन संघासाठी विजय खेचून आणला. ०-१ गोलने आठरे पाटील पब्लिक स्कूलने विजय मिळवला. आर्मी पब्लिक स्कूल (एसीसी ॲण्ड एस) विरुद्ध तक्षिला स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात आर्मी पब्लिक स्कूलचे खेळाडू विरेंद्र व वेदांत यांनी प्रत्येकी १ गोल करुन आपल्या संघाला विजय मिळवून देत अंतिम फेरी गाठली. प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करता आला नाही. २-० गोलने आर्मी पब्लिक स्कूल (एसीसी ॲण्ड एस) ने विजय संपादन केले.

Football tournament : 'फिरोदिया शिवाजीयन्स' फुटबॉल स्पर्धा; उपान्त्य फेरीतील थरारक सामन्यांनी वेधले लक्ष
Football tournament : ‘फिरोदिया शिवाजीयन्स’ फुटबॉल स्पर्धा; उपान्त्य फेरीतील थरारक सामन्यांनी वेधले लक्ष

१६ वर्ष वयोगटात आठरे पाटील पब्लिक स्कूल विरुद्ध रामराव आदिक स्कूल यांच्यात रंगतदार सामना उपस्थितांना पहावयास मिळाला. दोन्ही संघानी सुरुवातीपासून आक्रमक खेळी केली होती. आठरे पाटीलचा चांद भानू याने एकापाठोपाठ ३ गोल करुन संघाला विजय मिळवून दिला. रामराव आदिक संघाकडून रवी गायकवाड याने १ गोल केला. ३-१ गोलने आठरे पाटील पब्लिक स्कूलच्या संघाने विजय मिळवला. आर्मी पब्लिक स्कूल (एसीसी ॲण्ड एस) विरुद्ध डॉन बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यातील सामना शेवट पर्यंत रंगतदार राहिला. आर्मी पब्लिक स्कूलकडून एस. वेदांत याने १ व के. गौरव याने २ गोल केले. डॉन बॉस्कोकडून सिद्धांत कराळे याने १ गोल केला. ३-१ गोलने आर्मी पब्लिक स्कूलच्या (एसीसी ॲण्ड एस) संघाने विजय मिळवला. या गटातील विजयी संघ अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळणार आहे.


शनिवारी (ता. ५) फुटबॉलवर चित्रकला स्पर्धेचे आयोजन अंतिम सामन्याप्रसंगी नगर महाविद्यालयाच्या मैदानावर बालकांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. पहिली ते पाचवी (लहान गट), सहावी ते दहावी (मोठा गट) व खुल्या गटात ही स्पर्धा होणार असून, ही स्पर्धा निःशुल्क असणार आहे. सर्व शालेय विद्यार्थ्यांनी दुपारी २:३० वाजता स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामधील विजेत्यांना आकर्षक बक्षीस दिले जाणार आहे. तसेच पालकांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ देखील रंगणार आहे. अधिक माहितीसाठी पल्लवी सैंदाणे ८२०८७७१७९५ यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here