Football Tournament : राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा जिंकणे हेच नगर जिल्ह्याचे मुख्य ध्येय : नरेंद्र फिरोदिया

Football Tournament : राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा जिंकणे हेच नगर जिल्ह्याचे मुख्य ध्येय : नरेंद्र फिरोदिया

0
Football Tournament : राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा जिंकणे हेच नगर जिल्ह्याचे मुख्य ध्येय : नरेंद्र फिरोदिया
Football Tournament : राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा जिंकणे हेच नगर जिल्ह्याचे मुख्य ध्येय : नरेंद्र फिरोदिया

Football Tournament : नगर : अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन (Football Association) खेळासाठी व खेळाडू घडविण्यासाठी दिशादर्शकाची भूमिका महत्त्वाची आहे. खेळाडूंसाठी सोयी-सुविधा निर्माण करून देण्याचे काम केले जात आहे. राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा (Football Tournament) जिंकणे, हे नगर जिल्ह्याचे प्रथम ध्येय असून, त्यापुढे अजून मोठी वाटचाल सुरु राहणार आहे. मुलींमध्ये फुटबॉल खेळाची आवड निर्माण होण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी महिला खेळाडू पुढे येत आहे. खेळाडूंनी मान्यता नसलेल्या फुटबॉल स्पर्धेत सहभागी होऊ नये, असे आवाहन असोसिएशन अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी केले.

नक्की वाचा: संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे कर्जतमध्ये उत्साहात स्वागत

फुटबॉल असोसिएशनच्या पदाधिकारी व कार्यकारी सदस्यांची बैठक

अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या पदाधिकारी व कार्यकारी सदस्यांची बैठक हॉटेल आयरिश प्रीमियर येथे पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षीय भाषणात फिरोदिया बोलत होते. यावेळी शिरपूर (जि. धुळे) येथे १२ वर्षांखालील आंतर जिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप सबज्युनिअर स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत गेलेल्या नगर जिल्ह्यातील मुलांच्या संघातील खेळाडूंचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

अवश्य वाचा: फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

उपस्थिती (Football Tournament)

यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालिद सय्यद, मानद सचिव रौनप फर्नांडीस, सहसचिव प्रदीपकुमार जाधव, सहसचिव व्हिक्टर जोसेफ, सहखजिनदार रणबीरसिंग परमार, कार्यकारी सदस्य पल्लवी सैंदाणे, राजेंद्र पाटोळे, सादिक सय्यद, सॅवियो वेगास, जेव्हिअर स्वामी आदी उपस्थित हाेते.

फिरोदिया म्हणाले, ”अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनची स्थापना होऊन ५२ वर्षे झाली. सर्वात जुनी संघटना असलेल्या या असोसिएशनने जिल्ह्यात फुटबॉल जिवंत ठेवण्याचे काम केले. जगातील एक नंबरचा खेळ म्हणून फुटबॉलकडे पाहिले जाते. या खेळाच्या प्रचार-प्रसारासाठी असोसिएशन कार्य करत आहे. शहरातील दोन मुली मुख्य पंच म्हणून पुढे आल्या, हे मोठे यश आहे. फुटबॉलला नवीन उंचीवर घेऊन जाण्याचे कार्य सुरू असून, खेळाडूंना घडविण्यासाठी संघटना सक्षमपणे उभी राहणार आहे.”

या बैठकीत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व विविध स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंनी मिळवलेल्या यशाचा आढावा घेण्यात आला. तर भविष्यात राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेतील विजेतेपद पटकाविण्याचा संकल्प करण्यात आला. जिल्हा फुटबॉल असोसिएशनने खेळाडूंचा आत्मविश्‍वास वाढवला. प्रशिक्षण व सरावामुळे खेळाडू पुढे जात आहे. प्रशिक्षकांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केल्याने खेळाडूंमध्ये खेळाचे कौशल्य निर्माण होत आहे. जिल्ह्यातील फुटबॉल खेळाडूंचे भविष्य उज्ज्वल असून, चांगले खेळाडू घडणार असल्याच्या भावना उपस्थित पालकांनी व्यक्त केल्या.
मुख्य प्रशिक्षक विक्टर जोसेफ व राजू पाटोळे यांनी खेळाडूंसाठी असोसिएशनतर्फे स्पर्धेला जाण्या-येण्याची मोफत सोय केली आहे. याशिवाय स्पर्धेच्या ठिकाणी चांगली व्यवस्था करुन देण्यात आल्याची माहिती दिली. शिरपूर (जि. धुळे) येथे झालेल्या अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघातील खेळाडू भार्गव पिंपळे (कर्णधार), माहिर गुंदेचा (उपकर्णधार), यदुवर कोकरे, इंद्रजित गायकवाड, स्तवन ठोंबे, विराज दिघे, नमण दिवाणी, जोएल साठे, विरेंद्र वीर, सोहेल खान, श्रेयश बोठे, राजवर्धन वीर, अनुज दरेकर, अविनाश वल्लाळ, सियॉन बागुल, आयुष गाडळकर, देवांश झरेकर, पीयूष म्हैसमाळ यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाच्या शेवटी सी लायसेंन्स कोच जॉय जोनाथन व जेव्हिअर स्वामी व महिला पंच सोनिया दोसानी व प्रियांका आवारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पावसाळ्यानंतर अहमदनगर जिल्हा लिग स्पर्धा व त्यानंतर ॲलेक्स फर्नांडीस कप भरविण्यात येणार आहे. सहसचिव प्रदीपकुमार जाधव यांनी प्रास्ताविक करुन आभार मानले.

‘या’ खेळाडूंना स्पर्धेत नाे एन्ट्री

अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनची परवानगी नसलेल्या खेळाडूंना फुटबॉल स्पर्धेत सहभागी होता येणार नसल्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला. तर वर्ष २०२४-२५ साठी सीआरएस नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here