Football tournament : सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट व आर्मी पब्लिक स्कूलचे संघ विजयी

Football tournament

0
Football tournament

Football tournament : नगर : फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत (Football tournament) शालेय खेळाडूंचे रंगतदार सामने होत आहेत. १२, १४ व १६ वर्षांखालील वयोगटातील खेळाडूंचे संघ उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आहेत. अहमदनगर महाविद्यालयाच्या (Ahmednagar College) मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत गुरुवारी (ता. १९) १४ वर्षांखालील वयोगटात झालेल्या फुटबॉल (Football) सामन्यात सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट व आर्मी पब्लिक स्कूलने विजय मिळवला.

Football tournament

अवश्य वाचा: ‘धर्माचं भांडवल करु नका’,इंदुरीकर महाराजांकडून राजकारण्यांची कानउघडणी

१४ वर्षांखालील वयोगटातील मुलांचे झाले सामने

सकाळच्या सत्रात १४ वर्षांखालील वयोगटातील मुलांचे सामने झाले. यामध्ये ऊर्जा गुरुकुल विरुध्द सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट यांच्यात सामना अटीतटीचा झाला. यामध्ये सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट संघाकडून माहीर गुंदेचा याने १ गोल करुन प्रतिस्पर्धी संघावर ०-१ ने विजय मिळवला. 

Football tournament

नक्की वाचा: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी!आता फक्त ९९ रुपयांना मिळणार आवडीचा ब्रँड

७-० गोलने आर्मी पब्लिक स्कूलचे संघ विजयी (Football tournament)

आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द प्रियदर्शनी पब्लिक स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात आर्मी पब्लिक स्कूलने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन तब्बल ७ गोल केले. या सामन्यात प्रियदर्शनी पब्लिक स्कूलला प्रतिस्पर्धी संघावर एकही गोल करता आला नाही. आर्मी पब्लिक स्कूलकडून विरेंद्र व तन्मय याने प्रत्येकी दोन, सार्थक, प्रतीक व संकेत याने प्रत्येकी एक गोल करुन ७-० गोलने आर्मी पब्लिक स्कूलने एकतर्फी विजय मिळवला. स्पर्धेचे पंच म्हणून सलमान शेख, प्रियंका आवारे, सोनिया दोसानी, अभिषेक सोनवणे, ऋतिक छजलाणी यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फिरोदिया शिवाजीयन्सचे सदस्य परिश्रम घेत आहेत.

Football tournament