Football tournament : ‘फिरोदिया शिवाजीयन्स’ फुटबॉल स्पर्धा; आठरे पाटील, प्रवरा पब्लिक व आर्मी स्कूलच्या संघांकडून गुणांची कमाई 

Football tournament : 'फिरोदिया शिवाजीयन्स' फुटबॉल स्पर्धा; आठरे पाटील, प्रवरा पब्लिक व आर्मी स्कूलच्या संघांकडून गुणांची कमाई 

0
Football tournament : 'फिरोदिया शिवाजीयन्स' फुटबॉल स्पर्धा; आठरे पाटील, प्रवरा पब्लिक व आर्मी स्कूलच्या संघांकडून गुणांची कमाई 
Football tournament : 'फिरोदिया शिवाजीयन्स' फुटबॉल स्पर्धा; आठरे पाटील, प्रवरा पब्लिक व आर्मी स्कूलच्या संघांकडून गुणांची कमाई 

Football tournament : नगर : फिरोदिया शिवाजीयन्स (Firodia Shivajians) इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत (Football tournament) मंगळवारी (ता. २४) फुटबॉलचे थरारक सामने (Football matches) पार पडले. १२, १४ व १६ वर्ष वयोगटात सुरु असलेल्या या स्पर्धेत आठरे पाटील, प्रवरा पब्लिक, आर्मी स्कूलच्या संघाने गुणांची कमाई करुन आघाडी घेतली आहे. तर गुरुवारपासून १७ वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.

Football tournament : 'फिरोदिया शिवाजीयन्स' फुटबॉल स्पर्धा; आठरे पाटील, प्रवरा पब्लिक व आर्मी स्कूलच्या संघांकडून गुणांची कमाई 
Football tournament : ‘फिरोदिया शिवाजीयन्स’ फुटबॉल स्पर्धा; आठरे पाटील, प्रवरा पब्लिक व आर्मी स्कूलच्या संघांकडून गुणांची कमाई 

नक्की वाचा: पुरुषोत्तम करंडकात नगरचा डंका! नगरच्या’या’ एकांकिकेने मारली बाजी

०-५ गोलने तक्षिला स्कूलचा दणदणीत विजय (Football tournament)

मंगळवारी १४ वर्ष वयोगटात झालेल्या ऊर्जा गुरुकुल विरुद्ध आर्मी पब्लिक स्कूल (एपीस) यांच्यात झालेल्या सामन्यात आर्मी पब्लिक स्कूलचे खेळाडू आदर्श साबळे व प्रतीक शेळके यांनी प्रत्येकी १ गोल केले. या सामन्यात ०-२ गोलने आर्मी पब्लिक स्कूलचा संघ विजयी झाला. श्री साई स्कूल विरुद्ध तक्षिला यांच्यात झालेल्या सामन्यात तक्षिला स्कूलच्या खेळाडूंनी सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करुन एकापाठोपाठ पाच गोल केले. यामध्ये गौरव याने २, तर प्रितम देव, राजवीर, चिरायू यांनी प्रत्येकी १ गोल केला. ०-५ गोलने तक्षिला स्कूलच्या संघाने दणदणीत विजय मिळवला.

अवश्य वाचा: भिस्तबाग महाल नगर शहराचे पर्यटन केंद्र बनले – संग्राम जगताप

९-० गोलने आठरे पाटील पब्लिक स्कूलचा एकतर्फी विजय (Football tournament)

आठरे पाटील पब्लिक स्कूल विरुद्ध अशोकभाऊ फिरोदिया स्कूलमध्ये झालेल्या सामन्यात आठरे पाटील स्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. आठरे पाटीलचे इंद्रजीत गायकवाड व अशोक चांद या खेळाडूंनी दमदार खेळी करुन प्रत्येकी ३ गोल करुन विजय निश्‍चित केला. तर पवन कानडे, ओम लोखंडे, आदित्य सिंग यांनी प्रत्येकी १ गोल केला. ९-० गोलने आठरे पाटील पब्लिक स्कूलने एकतर्फी विजय मिळवला. डॉन बॉस्को विरुद्ध सक्रेडहार्ट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झालेल्या सामन्यात सक्रेडहार्ट कॉन्व्हेंटच्या संघाने तब्बल ९ गोल करुन ०-९ गोलने एकतर्फी विजय मिळवला. सक्रेडहार्ट कॉन्व्हेंटकडून जोएल साठा याने ४, तर मिहीर, असद तांबोळी, अंशुमन विधाते, फुरकान शेख, दर्शन या खेळाडूंनी प्रत्येकी १ गोल केला.


१६ वर्ष वयोगटात झालेल्या डॉन बॉस्को विरुद्ध श्री साई स्कूलच्या सामन्यात डॉन बॉस्को संघाने ३ गोल करुन ३-० गोलने विजय मिळवला. प्रतीक जाधव याने १ व वेदांत कस्तोरिया याने २ गोल केले.

फुटबॉल स्पर्धेतील संघांचे गुणांकन 
१२ वर्ष वगोगट अ ग्रुप- प्रवरा पब्लिक स्कूल (९), आर्मी स्कूल (३),
ब ग्रुप- आठरे पाटील (६), तक्षिला (३).
१४ वर्ष वयोगट अ ग्रुप- आठरे पाटील (६ गोलनुसार आघाडी), सक्रेडहार्ट कॉन्व्हेंट (३),
ब ग्रुप- आर्मी स्कूल (९), सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट (३).
१६ वर्ष वयोगट अ ग्रुप- आर्मी स्कूल (६), ओऍसीस (०),
ब ग्रुप- आठरे पाटील (६), अशोकभाऊ फिरोदिया (७).

गुरुवारपासून रंगणार १७ वर्षाखालील मुलींच्या संघाचे सामने
मुलींच्या ६ संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. हे सामने लीग पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. १५ सामने रंगणार असून, मुलींच्या संघात आर्मी स्कूल, ऑक्झिलियम कॉन्व्हेंट, आठरे पाटील, कर्नल परब, श्री साई व ओऍसीस स्कूलच्या संघाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here