Football tournament : रिमझिम पावसात रंगले फुटबॉलचे सामने

Football tournament : रिमझिम पावसात रंगले फुटबॉलचे सामने

0
Football tournament : रिमझिम पावसात रंगले फुटबॉलचे सामने

Football tournament : नगर : फिरोदिया शिवाजीयन्स (Firodia Shivajians) इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत (Football tournament) बुधवारी (ता. २५) झालेल्या विविध वयोगटाच्या फुटबॉल सामन्यात (Football matches) आठरे पाटील, आर्मी पब्लिक व रामराव आदिक स्कूल संघांनी दणदणीत विजय मिळवला. सर्व सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघांना एकही गोल करता आला नाही. दुपारच्या सत्रानंतर रिमझिम पाऊसात फुटबॉलचे सामने रंगले होते.

Football tournament : रिमझिम पावसात रंगले फुटबॉलचे सामने

नक्की वाचा: मोठी बातमी! मनोज जरांगेचं उपोषण स्थगित

०-६ गोलने आठरे पाटील स्कूलचा एकतर्फी विजय

ही स्पर्धा नगर महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु आहे. १२ वर्ष वयोगटात श्री साई स्कूलच्या संघाने सीआरएस पूर्तता न केल्यामुळे त्यांचा सामना होऊ शकला नाही. पोदार स्कूल विरुद्ध आठरे पाटील स्कूलमध्ये झालेल्या सामन्यात ०-६ गोलने आठरे पाटील स्कूलच्या संघाने एकतर्फी विजय मिळवला. सम्यक म्हस्के याने सर्वाधिक ४ गोल करुन विजय निश्‍चित केला. तर ओम गलांडे व मानस भोसले यांनी प्रत्येकी १ गोल केला. १४ वर्ष वयोगटात आर्मी पब्लिक स्कूल (एसीसी ॲण्ड एस) विरुद्ध डॉन बॉस्को यांच्यात झालेल्या सामन्यात आर्मी पब्लिक स्कूलने ५-० गोलने दणदणीत विजय मिळवला.

अवश्य वाचा: अकोले तालुक्यात रंगणार राजकीय संघर्ष

०-७ गोलने रामराव आदिक स्कूलचा संघ विजयी (Football tournament)

पावसाच्या रिमझिम सरीत आर्मी पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी आक्रमक खेळी करुन आदर्श साबळे ३, प्रतीक शेळके व विवेंद्र वीर याने प्रत्येकी १ गोल करुन संघाला विजय मिळवून दिला. १६ वर्ष वयोगटात कर्नल परब स्कूल विरुद्ध रामराव आदिक स्कूलमधील सामन्यात रामराव आदिक स्कूलने उत्कृष्ट खेळ करुन तब्बल ७ गोल केले. यामध्ये अनिल भोय व ललित गागर्डे यांनी प्रत्येकी ३ व रवी गायकवाड याने १ गोल केला. ०-७ गोलने रामराव आदिक स्कूलचा संघ विजयी झाला. आर्मी पब्लिक स्कूल विरुद्ध रामराव आदिक स्कूलमध्ये सामना रंगतदार झाला. या अटीतटीच्या सामन्यात आर्मी पब्लिक स्कूलकडून अश्‍मित पांडे व वेदांत शेंडगे यांनी प्रत्येकी १ गोल करुन २-० गोलने विजय मिळवला.