Football tournament : नगर : फिरोदिया शिवाजीयन्स (Firodia Shivajians) इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत (Football tournament) १७ वर्षाखालील मुलींच्या सामन्यांना गुरुवार (ता. २६) पासून प्रारंभ झाला. मुलींच्या उत्कृष्ट खेळाने नगर महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबॉलचा (Football matches) थरार रंगला होता. मुलींच्या ६ संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला असून, हे सामने लीग पद्धतीने खेळविण्यात येत आहे.
नक्की वाचा: मोठी बातमी! पावसामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द
९-० गोलने आठरे पाटीलचा संघ विजयी (Football tournament)
गुरुवारी १७ वर्षा खालील (मुली) आर्मी पब्लिक स्कूल विरुद्ध आठरे पाटील स्कूलचा उत्कृष्ट सामना रंगला होता. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने एकमेकांवर आक्रमक खेळी करुन देखील कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. ०-० गोल ने हा सामना अनिर्णित राहिला. आठरे पाटील पब्लिक स्कूल विरुद्ध कर्नल परब स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात आठरे पाटीलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळी करुन तब्बल ९ गोल केले. वेदिका ससे हिने तब्बल ५ गोल केले. नीलम पवार २ व आलिया सय्यद व स्वप्नाली शेळके हिने प्रत्येकी १ गोल केला. कर्नल परब स्कूलला या सामन्यात एकही गोल करता आला नाही. यामध्ये ९-० गोलने आठरे पाटीलचा संघ विजयी झाला.
अवश्य वाचा: मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट; हवामान विभागाचा अंदाज
६-० गोलने ऊर्जा गुरुकुलचा दणदणीत विजय (Football tournament)
१४ वर्ष वगोगटात (मुले) सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट विरुद्ध प्रियदर्शनी पब्लिक स्कूलमध्ये सामना झाला. यामध्ये सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट कडून मिहीर गुंदेचा २, सौरभ खंडेलवाल व जोएल साठे याने प्रत्येकी १ गोल केला. ४-० गोलने सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंटचा संघ विजयी झाला. ऊर्जा गुरुकुल विरुद्ध डॉन बॉस्को यांच्यात रंगलेल्या सामन्यात ऊर्जा गुरुकुलने दमदार खेळी करुन ६ गोल केले. प्रतिस्पर्धी संघाकडून एकही गोल झाला नाही. ६-० गोलने ऊर्जा गुरुकुलने दणदणीत विजय संपादन केले. यामध्ये प्रज्वल व गावित याने प्रत्येकी २ आणि समर्थ व तन्मय याने प्रत्येकी १ गोल केला. १६ वर्ष वयोगटात (मुले) आठरे पाटील स्कूल विरुद्ध डॉन बॉस्कोच्या सामन्यात आठरे पाटील स्कूलने एकामागोमाग ६ गोल केले. डॉन बॉस्कोकडून रेहान तांबोळी याने १ गोल केला. तर आठरे पाटील कडून भानू चांद ३, कृष्णा टेमकर २, यश गायकवाड १ गोल केला. ६-१ गोलने आठरे पाटील स्कूलचा संघ विजयी झाला.