Foreign Scholarship Scheme : परदेश शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

0
Foreign Scholarship Scheme : परदेश शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
Foreign Scholarship Scheme : परदेश शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Foreign Scholarship Scheme : नगर : अनुसूचित जाती (Scheduled Castes), विमुक्त भटक्या व अर्ध-भटकंती जमाती, भूमिहीन शेतमजूर आणि पारंपरिक कारागीर या श्रेणीतील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांमधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती योजना (Foreign Scholarship Scheme) राबविण्यात येत असून, या योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त प्रविण कोरगंटीवार (Pravin Korgantiwar) यांनी केले आहे.

अवश्य वाचा : रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सोशल मीडियातून टीकेचा भडीमार

या अटींची करावी लागणार पुर्तता

योजनेच्या लाभासाठी विद्यार्थी भारताचा रहिवासी असावा. विद्यार्थ्याचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्यूत्तर डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी किमान ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे. पीएचडी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर परीक्षेतही किमान ६० टक्के गुण आवश्यक आहेत. परदेशातील शिक्षण संस्था जागतिक क्रमवारीत ५०० च्या आत असावी.

नक्की वाचा : सावेडी उपनगरात युवकावर कोयत्याने हल्ला; सात जणांविरूध्द गुन्हा दाखल

लाभार्थींची संख्या (Foreign Scholarship Scheme)

योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या ११५, विमुक्त भटक्या व अर्ध-भटकंती जमातीच्या ६ तर भूमिहीन शेतमजूर व पारंपरिक कारागीर वर्गातील ४ विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्याला विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण शुल्काची पूर्ण रक्कम दिली जाते. आरोग्य विमा आणि व्हिसा शुल्क यासारख्या बाबी शिष्यवृत्तीधारकांसाठी मान्य राहतील. योजनेची माहिती तसेच अर्जाचा नमुना केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर www.nosmsje.gov.in उपलब्ध आहे.