Forest Area : नेवासा: तालुक्यातील नेवासा- शेवगाव महामार्गावरील नागापूर फाटा परिसरातील खुणेगाव वनीकरणाला (Forest Area) रविवारी (ता.९) दुपारी एक वाजेदरम्यान आग (Fire) लागल्याची घटना घडली. या आगीत अनेक वृक्ष भस्मसात झाले असल्याची माहिती समजते. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजले नसले तरी या परिसरात मद्यपींच्या (Alcoholic) उपद्रवातून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
नक्की वाचा : महिला ग्रामसभेत दारू दुकान गावाबाहेर घेऊन जाण्याचा निर्णय
काही वेळेतच हे अधिकारी- कर्मचारी घटनास्थळी हजर
नेवासा तालुक्यातील भानसहिवरे- सौंदाळा- खुणेगाव- नागापूर शिवारालगत असलेले खुणेगाव शिवारातील उजाड माळरानावर प्रादेशिक वन विभागाने १९८५ साली ७३ हेक्टर परिसरात वृक्षारोपण करून ती झाडे मोठ्या प्रयत्नांनी जागविली. याच वनीकरणाला रविवारी दुपारी प्रादेशिक वन विभाग परिसरात पाच एकरावर असलेल्या सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेस प्रथम आग लागल्याचे तेथील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. कर्मचाऱ्यांनी याबाबत वनपाल वैभव गाडे व वनरक्षक दामोधर धुळे तसेच सामाजिक वनीकरणाचे ढोणे यांना माहिती देताच काही वेळेतच हे अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले.
अवश्य वाचा : शिव्या बंदीच्या शासन निर्णयासाठी सरपंच आरगडे यांचे उपोषण
तातडीने आग विझविण्याचे प्रयत्न (Forest Area)
त्यांनी तातडीने ब्लोअर गन मशीनने आग विझविण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, त्यांच्या दीड तासांच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आली असली तरी वन विभागाची सुमारे आठ ते दहा हेक्टर वृक्षवल्ली आगीत खाक झाली. तर सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेचे २५-३० टक्के नुकसान झाले. रोपे सुरक्षित ठेवण्यास येथील कर्मचाऱ्यांस यश आले असले तरी साहित्याचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती आहे.