Forest Department : देवठाणमध्ये संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

Forest Department : देवठाणमध्ये संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

0
Forest Department : देवठाणमध्ये संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
Forest Department : देवठाणमध्ये संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

Forest Department : अकोले : वनविभागाच्या (Forest Department) कामकाजाविषयी नाराजी व्यक्त करत संतप्त झालेल्या देवठाण (Devthan) ग्रामस्थांनी शुक्रवारी (ता. १७) रास्ता रोको केला. गावशिवारात आणखी बिबटे (Leopard) असून सात दिवसांत सर्व जेरबंद करावेत अन्यथा पुन्हा आंदोलन करू, असा इशारा देत आंदोलन थांबविण्यात आले.

अवश्य वाचा : आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे धक्का बसला, डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली हळहळ

हल्ल्यानंतर वनखाते जागे होत असल्याचा आराेप

देवठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीनवर्षीय चिमुकलीचा मंगळवारी मृत्यू झाला. वनविभागाच्या रेस्क्यू टीमने बुधवारी दोन बिबटे जेरबंद केले. अकोले तालुक्यासहित सिन्नर, संगमनेर, जुन्नर या भागांमध्ये बिबट्यांची संख्या वाढली असून रोज नागरिकांसह जनावरांवर हल्ले होत आहेत. या हल्ल्यांमध्ये निष्पाप नागरिकांचा, लहान मुलांचा बळी जात आहे. बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता वनविभागाने नसबंदी करणे आवश्यक आहे. आपल्या भागात जेरबंद केलेले बिबटे याच भागात सोडल्यामुळे परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबट्याच्या हल्ल्यानंतर वनखाते जागे होते, ज्या परिसरात बिबट्याचा वावर असेल त्या भागात कायमस्वरूपी पिंजरे लावले जावेत, अशी मागणी करण्यात आली.

नक्की वाचा : दूध व्यवसाय ते सत्तेच्या शिखरापर्यंत; शिवाजीराव कर्डिलेंचा राजकीय प्रवास

१० पिंजरे द्यावे, अशी मागणी (Forest Department)

तालुका बिबट्या मुक्त करण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना करा, प्रत्येक ग्रामपंचायतींना वनविभागाकडून किमान १० पिंजरे द्यावे, अशीही मागणी करण्यात आली. सुधीर शेळके, अरुण शेळके, एकनाथ सहाणे, महेश सोनवणे, शिवाजी पाटोळे, तुळशीराम कातोरे, सीताबाई पथवे, मारूती मेंगाळ, अजय शेळके, आनंद गिन्हे, केशव बोडके, दीपक पथवे, रामनाथ पथवे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.