नगर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री (Former Karnataka CM) बी. एस. येडियुरप्पा (B.S. Yediyurappa) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोक्सो अॅक्ट अंतर्गत येडियुरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ वर्षांच्या मुलीच्या आईनं दाखल केलेल्या तक्रारीवरुन येडियुरप्पा यांच्यावर हा गुन्हा दाखल झालाय.
नक्की वाचा : निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये ;अजित पवारांचा इशारा
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात गुन्ह्याची नोंद (B.S. Yediyurappa)
सदाशिवनगर पोलिसांनी गुरुवारी (ता. १४) रात्री उशिरा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्यावर हा गुन्हा दाखल केला. १७ वर्षांच्या मुलीच्या आईनं केलेल्या तक्रारीवरून लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात हा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा, २०१२ च्या कलमाखाली कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अवश्य वाचा : शरद पवारांचे नाव व फोटो वापरणार नाही याची हमी द्या; सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारले
निवडणुकीच्या तोंडावर येडियुरप्पांवर गुन्हा दाखल (B.S. Yediyurappa)
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षांच्या पीडितेच्या सोबत असलेल्या आईनं गुरुवारी संध्याकाळी पोलिसांत तक्रार नोंदवली आणि मध्यरात्री माजी मुख्यमंत्री गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक अत्याचाराची कथित घटना २ फेब्रुवारी २०२४ रोजी घडली, जेव्हा आई आणि मुलगी एका फसवणूक प्रकरणात माजी मुख्यमंत्र्यांकडे मदत मागण्यासाठी गेल्या होत्या. निवडणुकीच्या तोंडावर येडियुरप्पा यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.