नगर : भारताचे दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्या स्मृती स्थळाला कोणती जागा मिळणार हा प्रश्न असतानाच आता ती जागा ठरली आहे. सिंग यांच्या कुटुंबाने दिल्लीमधील राजघाटाजवळ (Delhi Rajghat) राष्ट्रीय स्मृती स्थळ परिसरातील ९०० चौरस मीटरच्या भूखंडाला लिखित मंजुरी (Written approval) दिली आहे.या राष्ट्रीय स्मृतीस्थळ परिसरात ९ समाथी स्थळं आहेत. मागील आठवड्यात मनमोहन सिंग यांच्या मुली उपिंदर सिंग (Upinder Singh) व दमन सिंग (Daman Singh) यांनी आपल्या पतींबरोबर स्मृतीस्थळासाठी निश्चित केलेल्या जागेची पाहणी केली होती. त्यानंतर माजी पंतप्रधान सिंग यांच्या पत्नी गुरशरण कौर यांनी सरकारला औपचारिक स्वीकृती पत्र पाठवलं आहे.
नक्की वाचा : स्वारगेट अत्याचार प्रकरण;आरोपी दत्ता गाडेचा पोलिसांच्या गणवेशातील फोटो आला समोर
उपिंदर सिंग काय म्हणाल्या…(Manmohan Singh)

समोर आलेल्या माहितीनुसार,या राष्ट्रीय स्मृती स्थळ परिसरात केवळ दोन भूखंड बाकी होते. त्यापैकी एक भूखंड जानेवारी २०२५ मध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कुटुंबियांना दिला आहे. तर दुसरा ९०० चौरस मीटरचा भूखंड मनमोहन सिंग यांच्या कुटुंबाला दिला आहे. मनमोहन सिंग यांची मुलगी उपिंदर सिंग यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्या म्हणाल्या, “हा भूखंड एका ट्रस्टकडे सोपवला जाणार आहे. तिथे लवकरच स्मारक उभारलं जाईल. स्मारकाच्या बांधकामासाठी आम्ही सरकारकडे २५ लाख रुपयांपर्यंत अनुदान मागू शकतो,असं यासंबंधीच्या नियमांत म्हटलं आहे. सरकारने जमीन निवडली असून आमच्या कुटुंबाने त्या भूखंडाला मंजुरी दिली आहे.”
अवश्य वाचा : २८० टाके,अर्धा लिटर रक्त डोक्यातून वाहिलं!छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलेवर कटरने सपासप वार
कुठे असणार मनमोहन सिंग यांचं स्मारक ?(Manmohan Singh)
दिल्लीमधील राजघाटाजवळ राष्ट्रीय स्मृती स्थळ परिसरात मनमोहन सिंग यांचं हे स्मारक उभा राहील.सिंग यांच्या स्मृतीस्थळासाठी जो भूखंड देण्यात आला आहे. त्या भूखंडाच्या समोर माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचं स्मृतीस्थळ आहे. मागील बाजूस माजी राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांचं तर उजव्या-डाव्या बाजूला दोन माजी राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंग व प्रणव मुखर्जी यांचं स्मृती स्थळ आहे.
मनमोहन सिंह यांच्या स्मारकासाठी दिल्लीमधील एकता स्थळ आणि विजय घाट येथील जागा सरकारने सूचवल्या होत्या. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालय, गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही झाली. मात्र,नंतर समोर आलेल्या पर्यायातून सिंग यांच्या कुटुंबाने राजघाटाजवळ राष्ट्रीय स्मृती स्थळ परिसरातील भूखंडाला मंजुरी दिली आहे.