Accident : कंटेनर व दुचाकींच्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू 

Accident : पारनेरमधील पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कारण झालेल्या अपघातात पवार कुटुंबातील आई-वडिलांसह दोन भावंडांचा मृत्यू झाला आहे.

0
Accident
Accident

नगर :  नगर ते छत्रपती संभाजीनगर (Ahmednagar- Chatrapati Sambhaji Nagar Accident) महामार्गावर पांढरीपूल येथे रविवारी (ता. २८) कंटेनर आणि दुचाकींच्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाल्याची घटना सायंकाळी चारच्या सुमारास घडली. या अपघातात आई-वडिलांसह दोन भावंडांचा जागीच मृत्यू झाला.

नक्की वाचा : साेशल मीडियावर गप्पा ठाेकण्यापेक्षा सरकारी दरबारी हुशारी दाखवा; विरोधकांच्या टीकेवर मनोज जरांगेंचं चोख प्रत्युत्तर

अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपूलावर अपघात (Accident)

माहितीनुसार, रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपूल येथे कंटेनरने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. मयतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश असून या घटनेने पारनेरमध्ये मोठी खळबळ उडाली. अनिल बाळासाहेब पवार, सोनाली अनिल पवार, माउली अनिल पवार आणि एक सहा महिन्यांची मुलगी (सर्व रा. वडगाव सावताळ, टाकळी ढोकेश्वर, ता.पारनेर) अशी दुचाकीवरील मृतांची नावे आहेत.

अवश्य वाचा : रामाचे मंदिर उभारून अपमानाचे परिमार्जन व प्रक्षालन केले – सुनील देवधर

अपघातानंतर कंटेनर चालक फरार (Accident)

इमामपूर घाटाच्या तीव्र उतारावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या कंटेनरने पुढे चाललेल्या मोपेड दुचाकीला तसेच अजून दुसऱ्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली.ही घटना सायंकाळी चारच्या सुमारास घडली. त्यामध्ये मोपेड दुचाकीवरील चार जणांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील भगवान आव्हाड (रा. पांगरमल, ता. नगर) हे जखमी झाले आहेत. या अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला. मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव सावताळचे पवार कुटुंब हे कापूरवाडी (ता. नगर) येथे कांदा काढणीच्या कामासाठी एक ते दीड महिन्यापासून नगर तालुक्यात होते. मात्र एकाच वेळी कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्यामुळे वडगाव सावताळ गावावर शोककळा पसरली आहे.

हेही पहा : नगर जिल्ह्यात ‘रामराज्य’ येणार; आमदार राम शिंदे यांचे सुचक भाष्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here