Badlapur School Crime:धक्कादायक!बदलापूरच्या शाळेत चार वर्षांच्या चिमुकल्यांवर अत्याचार

0
Badlapur School Crime
Badlapur School Crime

Badalapur Crime: कोलकात्यात्तील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये (Badalapur) धक्कादायक घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार (Gender violence) केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर आता पालक आणि बदलापूरमधील अनेक नागरिक संतप्त झाले असून ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत.

नक्की वाचा : लाडक्या बहिणींना पुढच्या पाच वर्षात ९० हजार रूपये देणार,अजित पवारांचा लाडक्या बहिणीला शब्द

बदलापूरमधील घटनेत दोन तासात आरोपीला अटक (Badlapur School Crime)

बदलापूरमधील या संतापजनक घटनेवर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे. बदलापूर येथील दुर्दैवी घटनेत दोन तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात संस्थेचीसुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. तसेच हा गुन्हा जलदगतीने न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत,असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

या प्रकरणी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी पोलीस आयुक्तांशी स्वत: बोललो, त्या आरोपीला अटक झाली आहे, जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा होईल, पोक्सो अंतर्गत कलमं लावायला सांगितले आहे, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल, आरोपीला कठोर शिक्षा होईल. या खटल्यास विशेष पीपी नेमण्यास सांगितलं आहे. संस्था चालकांचीही चौकशी करुन जे दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करु. पोलिसांनी आरोपींना अरेस्ट केलं आहे, पोलिसांना अटेम्पट टू रेप हा खटला दाखल करायला सांगितलं आहे. संस्थाचालकांनीही कर्मचारी ठेवताना बॅकग्राऊंड तपासलं पाहिजे, जर तसं झालं नसेल तर त्यांच्यावरही कारवाई होईल.अत्यंत कठोर कारवाई करु, पोलीस, गृह विभाग आणि सरकार पूर्ण कठोर कारवाई करण्याच्या बाजूने असतील. कोणी पोलीस असतील, जे यात दोषी आढळले तर त्यांनाही सोडणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केली आहे.

अवश्य वाचा : जाणून घ्या… फोटोग्राफीचा रंजक इतिहास

शाळेकडून माफीनामा प्रसिद्ध (Badlapur School Crime)

घटना घडलेल्या शाळा प्रशासनाकडून फक्त एक माफीनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मुलींवर अत्याचार करणाऱ्या सफाई कर्मचारी पुरवणाऱ्या कंत्राटदारासोबतचा करार रद्द करण्यात आला असून सर्व पालक वर्गाची शाळेने जाहीर माफी मागितली आहे. घडलेला प्रकार दुर्दैवी, घृणास्पद आणि निंदनीय आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी संस्थेचा आग्रह आहे. आरोपीविरोधात पूर्ण क्षमतेने संस्थेने पोलिसांना आम्ही सहकार्य केले, असे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here