नगर : भारतीय अर्थव्यवस्थेविषयी (Indian Economy) मोठी बातमी समोर आली आहे. भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (The world’s fourth largest economy) ठरली आहे. भारताने जपानला मागे टाकत हे स्थान पटकवल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार, भारताचे एकूण सकल घरगुती उत्पादन (GDP) ४. १८ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचले आहे. याची अधिकृत माहिती २०२६ मध्ये जाहीर होणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (IMF) अंदाजानुसार, २०२६ मध्ये भारताचा GDP ४. ५१ ट्रिलियन डॉलर असू शकतो. तर जपानचा जीडीपी ४.४६ ट्रिलियन डॉलर असेल.
नक्की वाचा: राज्यात कोणाची कोणासोबत लढत;कुठे युती कुठे आघाडी? जाणून घ्या…
भारताची जगातील तिसरी अर्थव्यवस्था होण्याचा अंदाज (Fourth Largest Economy)
आर्थिक समीक्षा केली असता, जर भारतीय अर्थव्यवस्था अशीच घोडदौड करत राहिली तर भारत येत्या अडीच ते तीन वर्षांत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरेल. अंदाजानुसार, २०३० पर्यंत भारताची GDP ७.३ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचू शकते. जागतिक अस्थिरता आणि व्यापार, व्यावसायिक दबावापुढे न झुकता भारतीय अर्थव्यवस्था जोरदार आर्थिक आघाडीवर सरस कामगिरी करेल,असा अंदाज व्यक्त होत आहे.
अवश्य वाचा: निवडणुकीत उमेदवारांना दिला जाणारा AB फॉर्म म्हणजे नक्की काय?
सर्वसामान्य भारतीयांच्या उत्पन्नात घसरण (Fourth Largest Economy)
भारतीय अर्थव्यवस्था मोठी झेप घेत असली तरी एकूण GDP मध्ये भारताने मोठी झेप घेतली असली तरी सर्वसामान्य भारतीयांच्या उत्पन्नात मात्र घसरण होत आहे. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार,२०२४ मध्ये भारताच्या प्रत्येक व्यक्तिचे उत्पन्न केवळ २,६९४ डॉलर होते. तर जपानमधील सामान्य नागरिकांचे उत्पन्न आपल्यापेक्षा १२ पट आणि जर्मनीपेक्षा जवळपास २० पट अधिक आहे. भारत २०२३ मध्ये चीनला मागे टाकत सर्वाधिक लोकसंख्येचा देश झाला आहे. यातील जवळपास १.४अब्ज लोकसंख्या ही १० ते २६ वर्ष वयोगटातील आहे. भारत सर्वात तरुण देश ठरला आहे. पण रोजगार निर्मिती, नवीन नोकऱ्या आणि सर्वसामान्यांच्या हाती अधिक पैसा या सरकार समोरील सर्वात मोठे आव्हान आहे.



