Fraud : नगर : सावेडी उपनगरातील भिस्तबाग परिसरात असलेल्या ध्येय मल्टिस्टेट निधी लिमिटेड या वित्त संस्थेच्या संचालक मंडळा विरोधात एका महिलेने आर्थिक फसवणूक (Fraud) झाल्याची फिर्याद दिली आहे. त्यानुसार तोफखाना पोलिसांनी (Police) आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल (Filed a case) करून घेतला.
हे देखील वाचा: शांतीगिरी महाराजांचा नाशिकमध्ये हटके प्रचार
मोठ्या परताव्याचे आमिष
सावेडी उपनगरातील शिंदे मळा येथे राहत असलेल्या सुजाता नेवसे या गृहिणीने ध्येय मल्टिस्टेटमध्ये पैसे ठेवले होते. नेवसे यांना ध्येय मल्टिस्टेटकडून मोठ्या परताव्याचे आमिष दाखविण्यात आले होते. मात्र, संस्थेकडून कोणताही परतावा मिळाला नाही. नेवसे या मुद्दल रक्कम मागण्यासाठी गेल्या असता संस्थेकडून टाळाटाळ करण्यात आली. १२ डिसेंबर २०२३पासून ध्येय मल्टिस्टेटच्या सर्व शाखा बंद आहेत.
नक्की वाचा: नाशिकमध्ये चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची पोलिसांकडून झाडाझडती
अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल (Fraud)
ध्येय मल्टिस्टेटचे अध्यक्ष विशाल लक्ष्मण भागानगरे (रा. पंचपीर चावडी, माळीवाडा, नगर), उपाध्यक्ष रोहिदास सत्यदेव कवडे (रा. गुलमोहर रस्ता, सावेडी, नगर), संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल बबन कराळे (रा. टोकेवाडी, ता. नगर), संचालक गणेश कारभारी कराळे (रा. आगडगाव, ता. नगर), पूजा विलास रावते (रा. बोरूडे मळा, सावेडी, नगर) व विलास नामदेव रावते (रा. बोरुडे मळा, सावेडी, नगर) आदींनी आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन रणशेवरे करत आहेत.