Fraud : सोन्याच्या व्यवहारातून १ कोटी ९० लाखांची फसवणूक

Fraud : सोन्याच्या व्यवहारातून १ कोटी ९० लाखांची फसवणूक

0
Fraud : सोन्याच्या व्यवहारातून १ कोटी ९० लाखांची फसवणूक
Fraud : सोन्याच्या व्यवहारातून १ कोटी ९० लाखांची फसवणूक

Fraud : नगर : केडगाव परिसरात राहणार्‍या महिलेची सोन्याच्या व्यवसायाच्या व्यवहारातून (Gold Transactions) तब्बल १ कोटी ९० लाख रूपयांची फसवणूक (Fraud) झाल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात ४२ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आठ जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : तामिळनाडूमध्ये ७२ टक्के आरक्षण होऊ शकते,तर महाराष्ट्रात का नाही ?- शरद पवार

गुन्हा दाखल झालेल्या संशियितांची नावे

हिमेश दिलीप पोरवाल, प्रतिक्षा दिलीप पोरवाल, अनिता दिलीप पोरवाल, मुन्ना खंडेलवाल, यश साखरिया, सांची साखरिया, शुभम खंडेलवाल व हिमेश पोरवाल याची आत्या (नाव माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशियितांची नावे आहेत. २०२० मध्ये दिवंगत सोनार दिलीप पोरवाल यांचा मुलगा हिमेश पोरवाल याच्याशी फिर्यादीची ओळख झाली. सोन्याचे व्यवहार, मुंबईतील अडकलेले सोने सोडवण्यासाठी आर्थिक मदत या बहाण्याने हिमेशने फिर्यादीकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली.

आवश्य वाचा : सोनू सूद करणार स्टार प्लसच्या नवीन शो ‘संपूर्णा’चा ट्रेलर लॉन्च

व्यवहार पूर्ण न करता संशयित आरोपी गायब (Fraud)

फिर्यादी व त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींनी रोकड तसेच गहाण ठेवलेले दागिने मिळून एकूण १ कोटी ९० लाख रूपयांची मदत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्याबदल्यात काही धनादेश दिले गेले; मात्र नंतर व्यवहार पूर्ण न करता संशयित आरोपी गायब झाले. दरम्यान, फिर्यादीने पैसे व दागिन्यांची मागणी करण्यासाठी ६ जुलै रोजी संशयित आरोपींच्या घरी भेट दिली असता, हिमेश पोरवाल, पत्नी प्रतिक्षा, आई अनिता, बहिण सांची, सासरे मुन्ना खंडेलवाल, दाजी यश पोरवाल व नातेवाईक शुभम खंडेलवाल यांनी मिळून फिर्यादी व त्यांच्या मुलीवर हल्ला करत जातीवाचक शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.