Fraud : नगर : कमी किंमतीत प्लॉट (Plot) व जमीन घेवून देण्याच्या आमिषाने अहिल्यानगर औषध विक्रेत्याची १५ लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) कल्याण येथील बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संदीप दत्तात्रय खरपुडे (रा. गोंधळे गल्ली, माळीवाडा, हल्ली रा. एकदंत कॉलनी, औसरकर मळा, सारसनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
अवश्य वाचा: राजेंद्र फाळकेंच्या राजीनाम्यामागे हे आहे राजकीय कारण, जाणून घ्या!
विश्वास ठेवून बँक खात्यावर पाठविले पैसे
फिर्यादी यांचे मेडिकल दुकान आहे. त्यांचे मित्र स्वप्निल लाहोर यांच्यामार्फत त्यांची कल्याण येथील बांधकाम व्यावसायिक आशिष उमाशंकर पांडे याच्याशी ओळख झाली. सन २०२१ मध्ये स्वप्निल लाहोर याने फिर्यादीला सांगितले की, आशिष पांडे हा कमी किंमतीत प्लॉट व जमीन घेवून देतो. त्यामुळे फिर्यादीने त्याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी आशिष पांडे याने जमीन खरेदी करून देण्यासाठी १५ लाख रुपये मागितले. त्याच्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी त्यास २१ जानेवारी २०२१ रोजी त्याच्या बँक खात्यावर ५ लाख व त्याचे वडील उमाशंकर पांडे यांच्या बँक खात्यावर ५ लाख तसेच २२ जानेवारी रोजी पुन्हा ५ लाख असे १५ लाख रुपये आरटीजीएसद्वारे पाठविले. त्यावेळी त्याने १५ दिवसांत तुम्हाला प्लॉट व जमिनीची खरेदी देतो, असे सांगितले.
नक्की वाचा : शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोगातून उत्पन्न वाढवावे : जिल्हाधिकारी आशिया
आशिष पांडे म्हणाला की, (Fraud)
माझ्याकडून तुमचे काम होणार नाही, मी तुमचे १५ लाख परत देतो. त्यानंतर काही दिवसांनी फिर्यादीने आशिष पांडे यास पैशांची मागणी केली. मात्र त्याने पैसे दिले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर खरपुडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.