Fraud : जैविक इंधन निर्मितीच्या नावाखाली ३८ लाखांची फसवणूक

Fraud : जैविक इंधन निर्मितीच्या नावाखाली ३८ लाखांची फसवणूक

0
Fraud : जैविक इंधन निर्मितीच्या नावाखाली ३८ लाखांची फसवणूक
Fraud : जैविक इंधन निर्मितीच्या नावाखाली ३८ लाखांची फसवणूक

Fraud : नगर : केंद्र शासन (Central Government) पुरस्कृत जैविक इंधन निर्मिती व पुरवठा या कार्यक्रमा अंतर्गत सी.बी.जी. निर्मिती करणारा उत्पादन प्रकल्प स्थापित करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील एकाची ३८ लाखांची फसवणूक (Fraud) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराबाबत थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यानुसार अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांच्याकडे चौकशी साठी प्राप्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात फसवणुकीची आणखी एका घटना समोर आली आहे.

नक्की वाचा : अखेर मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीची अधिकृत घोषणा

पैशाची मागणी केल्यावर कंपनीकडून बेजबाबदार उत्तरे

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील व्यंकटेश बायोफ्युएल ॲण्ड बायोॲनर्जी सोर्सेस यांनी केंद्र शासन पुरस्कृत जैविक इंधन निर्मीती व पुरवठा या कार्यक्रमा अंतर्गत सी.बी.जी. निर्मिती करणार उत्पादन प्रकल्प स्थापित करण्यासाठी नेक्सजन एनर्जिया लिमिटेड नोएडा, उत्तर प्रदेश या कंपनीबरोबर सामंजस्य करार ऑक्टोबर २०२३ मध्ये मुंबई येथील कार्यालयात झाला होता. परंतु या कंपनीने सामंजस्य करार पूर्ण होताच उत्पादन प्रकल्प निर्मीती करीता सहकार्य करणे गरजेचे होते. परंतु ते न करता त्यांनी प्रथम आर्थिक सहकार्य कर्ज प्रकरण, तांत्रिक माहीती, डी. पी. के., सरकारी सबसिडी, इंधन कंपनीबरोबर पुरवठा करार यापैकी कोठेही कंपनीने ठरल्याप्रमाणे काम केले नाही. या दरम्यान कंपनीला एकूण ३८ लाख रुपये दिले. मात्र, हे काम न झाल्याने कंपनीकडे पैशाची मागणी केली असता कंपनीने बेजबाबदार उत्तरे दिली. तसेच त्यांनी वेळोवेळी सरकारी खाते पेट्रोलियम ॲण्ड नॅचरल गॅस मंत्रालय, रस्ते विकास मंत्रालय, गृह खाते भारत सरकार यांना या फसव्या कंपनीबाबत ई-मेल द्वारे माहीती दिली असल्याचा आरोप त्यांनी केला असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

अवश्य वाचा: राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता; संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

भारतभर व्यवसायीकांची फसवणूक केल्याचे उघड (Fraud)

तसेच मागील काही वर्षांपासून या कंपनीने भारतभर फसवणूक केलेल्या व्यवसायीकांची प्रकरण उघड होत आहेत. या कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. त्यानुसार अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे चौकशी साठी अर्ज प्राप्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात फसवणुकीची आणखी एका घटना समोर आली आहे.