Fraud : बनावट सोन्याचे बिस्कीट देत फसवणूक करणारा गजाआड

Fraud : बनावट सोन्याचे बिस्कीट देत फसवणूक करणारा गजाआड

0
Fraud : बनावट सोन्याचे बिस्कीट देत फसवणूक करणारा गजाआड
Fraud : बनावट सोन्याचे बिस्कीट देत फसवणूक करणारा गजाआड

Fraud : नगर : सोनसाखळीच्या बदल्यात बनावट सोन्याचे बिस्कीट (Gold Biscuits) देणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी (Police) जेरबंद केले. संतोष मोहनराव चिंतामणी (रा. राजगुरूनगर पेठ, ता. जि. बीड) असे जेरबंद आरोपीचे नाव आहे. माळीवाडा बसस्थानक रस्त्यावर हा आरोपी फसवणूक (Fraud) करत होता.

नक्की वाचा: शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुतेंवर गुन्हा दाखल

फसवणुकीचा गुन्हा दाखल

भिंगार येथील सुमन खोजे यांना माळीवाडा बसस्थानक रस्त्यावर पांढरा शर्ट, काळी पँट, डोक्यात टोपी, पायात चप्पल घातलेला एक व्यक्ती काल (ता. २७) भेटला. तो खोजे यांना म्हणाला, “माझ्या ओळखीच्या एकाला रस्त्यावर सोन्याचे बिस्कीट मिळाले आहे. ते मी तुम्हाला मिळवून देतो. त्या बदल्यात मला तुमची सोन्याची चैन द्या.” त्यानुसार खोजे यांनी त्या व्यक्तीला सोन्याची चैन दिली. त्याने खोजे यांना त्या बदल्यात बनावट सोन्याचे बिस्कीट दिले. खोजे यांनी नंतर चौकशी केली असता त्यांना हे बिस्कीट बनावट असल्याचे कळाले. त्यानुसार त्यांनी तातडीने कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेतला.

अवश्य वाचा: ‘आम्ही सगळयांनाच पक्षात घेणार नाही,थर्मामीटर लावून पाहू कोण योग्य’- अनिल देशमुख

चोरीची सोन्याची चैन हस्तगत (Fraud)

फिर्याद दाखल होताच कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांनी आरोपीला पकडण्यासाठी पथकाला रवाना केले. पथकाने खोजे यांच्याकडून माहिती घेतली असता आरोपी नगर कॉलेजच्या दिशेने गेल्याचे कळाले. त्यानुसार पथकाने शोध घेतला असता चांदणी चौकात खोजे यांनी वर्णन केल्या प्रमाणे दिसणारी एक व्यक्ती खासगी वाहनांच्या प्रतीक्षेत उभी होती. पथकाने संशयीत आरोपीकडे अधिक सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडील चोरीची सोन्याची चैन हस्तगत करण्यात आली.