Fraud : पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांची फसवणूक करणारा आरोपी जेरबंद

Fraud : पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांची फसवणूक करणारा आरोपी जेरबंद

0
Fraud : पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांची फसवणूक करणारा आरोपी जेरबंद
Fraud : पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांची फसवणूक करणारा आरोपी जेरबंद

Fraud : नगर : पोलीस असल्याचे सांगून नागरिकांची फसवणूक (Fraud) करत चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला (Hardened Criminal) स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) अटक केली आहे. या कारवाईमुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर आळा बसण्यास मदत होणार आहे.

नक्की वाचा : ढवळपुरी परिसराला गारपिटीचा तडाखा; काढणीला आलेली पिके मातीमोल, शेतकरी हवालदिल

मोबाईल सोन्याच्या दोन अंगठ्या घेत फसवणूक

९ ऑगस्ट २०२५ रोजी सावेडी परिसरातील जॉगिंग पार्कजवळ फिर्यादी रवींद्र नारायण राजहंस हे फोन करण्यासाठी थांबले असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यापैकी एकाने स्वतःला पोलीस असल्याचे सांगत आयकार्ड दाखवले, तर दुसऱ्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी फिर्यादीच्या खिशातील मोबाईल, सुट्टे पैसे तसेच हातातील सोन्याच्या दोन व तांब्याच्या दोन अंगठ्या घेत फसवणूक केली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पोलिसांनी सापळा रचून घेतले ताब्यात (Fraud)

या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आरोपी गोविंदपुरा नाका, भिंगार परिसरात येणार असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सज्जाद गरीब शहा इराणी (वय ४७, रा. श्रीरामपूर) असे असून त्याने हा गुन्हा आपल्या चुलत भावासोबत केल्याची कबुली दिली आहे. त्याचा साथीदार मुस्लीम यासीन इराणी हा सध्या फरार आहे. तसेच आरोपीने संगमनेर येथेही अशाच प्रकारचा गुन्हा केल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे आरोपीविरुद्ध राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल असून त्याच्यावर १०० ते १२५ गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सदर आरोपीला पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार राहुल द्वारके, फुरकान शेख, भिमराज खर्से, रिचर्ड गायकवाड, राहुल डोके, सुनील मालणकर, भगवान थोरात, सतीश भवर, चालक उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने केली आहे.