Fraud : तांदूळ व्यापाऱ्याची सव्वा कोटीची फसवणूक; गुन्हा दाखल

Fraud : तांदूळ व्यापाऱ्याची सव्वा कोटीची फसवणूक; गुन्हा दाखल

0
Fraud : तांदूळ व्यापाऱ्याची सव्वा कोटीची फसवणूक; गुन्हा दाखल
Fraud : तांदूळ व्यापाऱ्याची सव्वा कोटीची फसवणूक; गुन्हा दाखल

Fraud : नगर : अहिल्यानगर शहरातील (Ahilyanagar City) एका व्यापाऱ्याची जादा नफ्याचे अमिष दाखवून तब्बल एक कोटी ११ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : शिर्डी जमीन व्यवहारात फसवणूक; खरात पती-पत्नीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

संशयित आरोपींची नावे

आरोपी सतिष सिद्रप्पा कोरी, अथर्व अशोक कोरी (दोघे रा. पुणे), सुमेध सुभाष बसवड (रा. डोंबिवली) आणि प्रकाश सरजू तंडन (रा. छत्तीसगड), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत पियुष संजय शिंगवी यांनी फिर्याद दिली आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

फिर्यादीत म्हटले की (Fraud)

फिर्यादीत म्हटले आहे की, सुमेध बसवड व इतर साथीदारांनी संगणमत करून व्यवसायात मोठा नफ्याचे अमिष दाखवले. व विविध बनावट कागदपत्रे तयार करून शिंगवी यांचा विश्वास संपादन केला. या विश्वासाचा फायदा घेत फिर्यादी कडून १ कोटी ७ लाख रुपये किमतीचा तांदूळ घेतला. व हा माल पोहोचवण्यासाठी आणखी ४ लाख ६० हजार रुपये ऑनलाइन स्वरूपात उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिंगवी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.