Fraud : श्रीगोंदा: शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करून जादा परताव्याच्या आमिषाने वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरून कोट्यवधी रुपयांची श्रीगोंदा तालुक्यातील अनेकांची फसवणूक (Fraud) झाली असल्याची चर्चा असतानाच श्रीगोंदा पोलीस ठाण्यात (Shrigonda Police Station) एका प्लॅटफॉर्मच्या संचालक मंडळाच्या विरोधात ७३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : राशीनमध्ये सुगंधी तंबाखू आणि गुटखा पकडला; साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
यांच्याविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी नवनाथ जगगनाथ अवताडे, अगस्त मिश्रा, राहुल काळोखे, गौरव सुखदिवे, प्रसाद कुलकर्णी, सचिन खडतरे, ययाती मिश्रा, शुभम नवनाथ अवताडे, सुवर्णा नवनाथ अवताडे, रंगनाथ गलांडे, अनिल दरेकर, संदीप दरेकर यांच्याविरोधात नितीन अंबादास गांगर्डे (रा.मांदळी, ता.कर्जत) यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी अनिल झुंबर दरेकर, रंगनाथ उर्फ पिंटू तुळशीराम गलांडे या दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
नक्की वाचा : नगरकरांमध्ये अजूनही मोटर सायकलचीच क्रेझ; कारपेक्षा ट्रॅक्टरला मागणी जास्त
विश्वास संपादन करत शेअर बाजारात गुंतवणूकीस सांगितले (Fraud)
याबाबत पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी यांना आरोपी संदीप दरेकर आणि अनिल दरेकर यांनी विश्वास संपादन करत शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यांनी दिलेल्या विश्वासाने फिर्यादी यांनी एका प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या वेळी सुमारे ७३ लाख ५० हजार रक्कम जमा केली. या रकमेवर ठरल्याप्रमाणे महिना ६ ते ८ टक्के दराने परतावा घेत गेले. फिर्यादी यांना ३ एप्रिलपर्यंत जमा रकमेच्या वरती १८ लाख ८० हजार ६५५ रुपयांचा परतावा मिळाला. मात्र मे २०२५ मध्ये परतावा वेळेत न मिळाल्याने गलांडे यांना विचारणा केली असता तांत्रिक अडचण असल्याचे सांगत परतावं जमा होणार असल्याचे सांगितले. जून २०२५ पर्यंत परतावा न मिळाल्याने अनिल दरेकर, संदीप दरेकर, नवनाथ औताडे यांना विचारणा केली असताना त्यांनी तांत्रिक अडचणी असल्याने व वेबसाईट अपग्रेडेशन चालू असल्याचे सांगत परतावा जमा होण्याचे विश्वास देत रक्कम जमा करण्यास टाळाटाळ केली. याबाबत पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत.