Fraud Calls : पाथर्डी शहरात फ्रॉड कॉल्सचा कहर; मोबाईलवर आले शेकडो ओटीपी

Fraud Calls : पाथर्डी शहरात फ्रॉड कॉल्सचा कहर; मोबाईलवर आले शेकडो ओटीपी

0
Fraud Calls : पाथर्डी शहरात फ्रॉड कॉल्सचा कहर; मोबाईलवर आले शेकडो ओटीपी
Fraud Calls : पाथर्डी शहरात फ्रॉड कॉल्सचा कहर; मोबाईलवर आले शेकडो ओटीपी

Fraud Calls : पाथर्डी : शहरात सध्या फ्रॉड कॉल्सचा (Fraud Calls) कहर सुरू असून, व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांना अज्ञात व्यक्तींकडून धमकीचे फोन येत आहेत. तुमच्या मुलाने गुन्हा केला आहे, अटक होईल, तुम्ही जामीनदार आहात, फायनान्स कंपनीकडून (Finance Company) कर्जदाराने पैसे न भरल्याने तुमच्यावर वॉरंट (Warrant) निघाले आहे, अशा भीतीदायक धमक्या देऊन ओटीपी, पिन किंवा बँक तपशील मागितले जात आहेत. मात्र, काही जागरूक नागरिकांनी या फसवणूककर्त्यांचा भांडाफोड करून त्यांना चांगलेच सुनावले आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून, अशा कॉल्सवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

नक्की वाचा : मनोज जरांगे पाटील बुधवारी अहिल्यानगरमधून जाणार

काही दिवसांत अशा फ्रॉडकॉल्समध्ये वाढ

या नव्या प्रकारच्या सायबर फसवणुकीला ‘डिजिटल अरेस्ट’ असे नाव देण्यात आले आहे. या गुन्ह्यात फ्रॉडर स्वतःला पोलीस किंवा बँक अधिकारी म्हणून सादर करतात. ते वैयक्तिक आपली व आजूबाजूची माहिती जाणून पीडितांना घाबरवतात आणि त्यांच्या बँक खात्यातील पैसे उकळतात. पाथर्डी परिसरात गेल्या काही दिवसांत अशा कॉल्समध्ये वाढ झाली आहे. फ्रॉडर स्वतःला फायनान्स कंपनीचे कर्मचारी म्हणून ओटीपी किंवा बँक डिटेल्स न मिळाल्यास ते धमकी देतात, तुमच्या दुकानात येऊन मोडतोड करू नुकसान करू, असे सांगत शिवीगाळ केली जाते.

आवश्य वाचा : रंधा धबधबा येथे होणार काचेचा पूल

सायबर सुरक्षिततेचे आवाहन केले (Fraud Calls)

दोन दिवसांपूर्वी काही नागरिकांना एकावर एक असे शेकडो ओटीपी मोबाईलवर आले. ओटीपी द्या नाहीतर कारवाई होईल’ असे सांगण्यात आले. मात्र, शहरातील काही सावध नागरिकांनी या फसवणूककर्त्यांना उलट प्रश्न विचारले. एका पीडिताने प्रश्न विचारताच कॉलरने फोन कट केला, तर काहींनी त्यांना जोरदार सुनावले. पाथर्डीचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी या प्रकरणी नागरिकांना सायबर सुरक्षिततेचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, सायबर फसवणुकीपासून सावध राहा. फसव्या कॉल्सपासून दूर राहून संशयास्पद कॉल तात्काळ नाकारा. लिंक्स उघडू नका, बँक तपशील गोपनीय ठेवा. कोणतीही बँक ओटीपी किंवा खाते माहिती फोनवर मागत नाही. पोलीस किंवा बँक अधिकारी कधीही फोनवरून पैसे किंवा वैयक्तिक माहिती मागत नाहीत. अटक किंवा कारवाईसाठी वैध नोटीस प्रत्यक्ष दिली जाते.

आमिषाला बळी पडू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका. बँकेशी संपर्क साधा आणि फसवणुकीच्या कॉल्सबाबत त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा. सायबर फसवणुकीविरुद्ध सतर्क राहा, तक्रारीवर कारवाई केली जाईल.अशा कॉल्स आल्यास शांत राहावे, वैयक्तिक माहिती देऊ नये आणि तत्काळ सायबर क्राइम हेल्पलाइन किंवा स्थानिक पोलिसांना कळवावे.