Fraud : वर्कफ्रॉम होम जॉबच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी जेरबंद

युवकाला १२ लाख ३६ हजार २६७ रुपयांना फसविण्यात (Fraud) आले. या प्रकरणी नगरच्या सायबर पोलिसांनी तातडीने शोध घेत तीन आरोपींना ताब्यात घेतले.

0

नगर : वर्कफ्रॉम होम जॉब देण्याचा बहाणा करत नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथील एका युवकाला १२ लाख ३६ हजार २६७ रुपयांना फसविण्यात (Fraud) आले. या प्रकरणी नगरच्या सायबर पोलिसांनी (Cyber Police) तातडीने शोध घेत तीन आरोपींना (accused) ताब्यात घेतले. यातील दोन आरोपी नाशिकचे तर एक आरोपी मुंबईतील आहे.

हे देखील वाचा : खूशखबर; एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट सहा हजारांचा बाेनस जाहीर

हिरामण पंडित सोनवणे (वय ३६, रा. प्रिन्स पॅलेस अपार्टमेंट, धात्रक फाटा, आडगाव, नाशिक), शक्ती माणिकलाल कर्नावट (वय ३४, रा. आडगाव, नाशिक) व प्रथम भावेश गथाणी (वय ३०, रा. घाटकोपर, मुंबई) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत. बाबुर्डी बेंद येथील दत्तात्रेय चोभे यांना व्हॉटसअॅप व टेलिग्रामवरून आरोपींनी संपर्क साधला. आरोपींनी इन्फो इज इंडिया लि. कंपनीचे अधिकारी असल्याचे सांगत पार्टटाईम जॉब देतो असे सांगितले. तसेच विविध बँक खात्यांवर पैसे भरण्यास लावले. त्यानुसार चोभे यांनी १२ लाख ३६ हजार २६७ रुपये बँक खात्यांवर भरले होते. ही फसवणूक लक्षात आल्यावर त्यांनी नगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

नक्की वाचा : यंदा दिवाळीत अवकाळी बरसणार

पोलीस निरीक्षक संजय सोनवणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल सानप यांच्या पथकाने आरोपींचा तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर शोध घेतला. या पथकात पोलीस हेडकॉन्टेबल योगेश गोसावी, राहुल हुसळे, पोलीस नाईक अभिजित अरकल, पोलीस कॉन्टेबल गणेश पाटील, अरुण सांगळे आदींचा समावेश होता. पथकाने हरियाणा, गुजरात, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश राज्यांत तसेच नाशिक व मुंबई येथे तपास करून आरोपींना ताब्यात घेतले. पथकाने विविध बँकांशी संपर्क करून त्यांच्या खात्यात गेलेले पाच लाख पाच हजार ४१८ रुपये आतापर्यंत मिळविले आहेत. उर्वरित रक्कम मिळविण्याचे प्रयत्न सायबर पोलिसांकडून सुरू आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here