Free Bicycle Distribution : अकोले: स्व. बाबुराव सखाराम बोर्हाडे (बी.एस.बी.) एज्युकेशनल संस्था उल्हासनगर ४ संचालित न्यू इंग्लिश स्कूल जांभळेवाडी (New English School Jambhalewadi) (सातेवाडी, ता.अकोले) विद्यालयात वाघोली पुणे येथील डाकसेवक नामदेव गवळी यांच्या प्रयत्नातून आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल जगताप, दत्तात्रेय मुठे यांच्या सहकार्यातून ५० विद्यार्थ्यांना सायकलींचे मोफत वाटप (Free Bicycle Distribution) करण्यात आले.
अवश्य वाचा : श्री क्षेत्र मोहटा देवी ट्रस्टच्या नूतन विश्वस्त मंडळाची घोषणा
सायकल मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद
सातेवाडी येथे येसरठाव, खेतेवाडी, घोटकरवाडी, मोरवाडी, गांजविहीर, खवटी, त्रिशूळवाडी, जांभळेवाडी यांसारख्या डोंगरदर्यांतून विद्यार्थी शाळेत येतात. शाळेत येण्यास उशीर होतो, त्याचा परिणाम अभ्यासावर व गुणवत्तेवर होतो. त्यांच्या शिक्षणात खंड पडू शकतो, मुले सहा-सात किलोमीटर वरून पायी येतात. विशेष म्हणजे या गावात एसटी बस पण येत नाही. सायकल मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद दिसत होता. तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात सायकल मोफत वाटप करण्यात आले आहे.
नक्की वाचा : श्रीगोंद्यात महायुतीमध्ये फूट; नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होणार
विद्यार्थ्यांनाही सामाजीक कार्य करण्याचे आवाहन (Free Bicycle Distribution)
याप्रसंगी नामदेव गवळी, अमोल जगताप व दत्तू मुठे यांनी विद्यार्थ्यांना मोठे झाल्यावर आमचे कार्य पुढे चालू ठेवण्याचे आवाहन केले. तसेच संस्थेचे कार्यकारी संचालक प्रतीक बोर्हाडे म्हणाले, मोफत मिळालेल्या सायकलची विद्यार्थ्यांनी जाणीव ठेवावी आणि यापासून प्रेरणा घेऊन पुढे आपणही मोठे झाल्यावर असेच परिसरातील विद्यार्थ्यांस व विद्यालयास सहकार्य करावे. यावेळी श्री. झांजे, सातेवाडीचे सरपंच केशव बुळे, मुख्याध्यापक एस. एम. देशमुख, बी. के. देशमुख, सावरकुटेचे मुख्याध्यापक आर. एल. आरोटे, ए. के. पवार, उपसरपंच रोहिणी गभाले, मारुती मुठे, लक्ष्मण मुठे, ज्ञानदेव मुठे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जानकीनाथ मुठे, रंगनाथ मुठे, काशिनाथ दिघे, शिवराम दिघे, शिक्षक काळे, डाके, श्रीमती खुर्पे, अशोक साबळे, सीताराम मुठे, पालक व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. सूत्रसंचालन एच. बी. काळे यांनी केले.



