Free Health Checkup Camp : शेवगाव : बालमटाकळीचे (Balam Takali) ग्रामदैवत श्री बालंबिका देवी यात्रा उत्सव एका दिवसावर येऊन ठेपला आहे. यामुळे यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. बालंबिका देवीच्या दर्शनाला संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. या भाविकांना मोफत आरोग्य सुविधेचा लाभ घेता यावा, यासाठी यंदाही मोफत सर्व रोग निदान महाशिबीर (Free Health Checkup Camp) राबविण्यात येणार असल्याची माहिती व्यंकटेश मल्टीस्टेटचे अध्यक्ष कृष्णा मसुरे यांनी दिली आहे.
नक्की वाचा : ‘विधानसभेला ते तिन्ही पक्ष स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू,चिंता नाही’-राधाकृष्ण विखे पाटील
व्यंकटेश मल्टीस्टेट व सुरभी हाॅस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने शिबीर
हे महाशिबीर व्यंकटेश फाऊंडेशन, व्यंकटेश मल्टीस्टेट व सुरभी हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता.१५) सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सर्वांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
अवश्य वाचा : मोठी बातमी!पंजाबमधील आप आमदाराचा गोळी लागून मृत्यू
मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरही घेणार (Free Health Checkup Camp)
या सर्वरोग निदान शिबिरामध्ये पोट विकार, हृदयरोग, मेंदू व मणक्यांचा आजार, मधुमेह, अस्थिरोग आणि स्त्री-आरोग्य यांच्याशी संबंधित रोगांचे निदान करण्यात येणार आहे. यासाठी तज्ज्ञ डाॅक्टरांची उपस्थिती या शिबीरात असणार आहे. तसेच, या महाशिबीरामध्ये अल्पदरात काही महत्वाचे स्कॅनही करण्यात येणार आहे. यामध्ये टु-डी इको, एन्डोस्कोपी, एक्स-रे, कोलोनोस्कोपी, फायब्रोस्कॅन (लिव्हर तपासणी), सिटी स्कॅन आणि पॅप्समियर (गर्भपिशवीच्या मुखाची कॅन्सर तपासणी) यांचा समावेश आहे. याचबरोबर या महाशिबीरामध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरही घेण्यात येणार आहे. यासाठी सर्व पद्धतीची तयारी युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती मसुरे यांनी दिली.