Free Laparoscopy Surgery : महापालिकेकडून महिलांसाठी मोफत लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया उपलब्ध

Free Laparoscopy Surgery : महापालिकेकडून महिलांसाठी मोफत लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया उपलब्ध

0
Free Laparoscopy Surgery : महापालिकेकडून महिलांसाठी मोफत लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया उपलब्ध
Free Laparoscopy Surgery : महापालिकेकडून महिलांसाठी मोफत लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया उपलब्ध

Free Laparoscopy Surgery : नगर : अहिल्यानगर महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे दवाखाना व प्रसूतीगृह (Balasaheb Deshpande Hospital) येथे लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया (Free Laparoscopy Surgery) उपलब्ध करण्यात आली आहे. त्यासाठी आयडीबीआय बँकेच्या (IDBI Bank) माध्यमातून अत्याधुनिक उपकरणे दाखल झाली आहेत. शहरातील महिलांना अत्याधुनिक, सुरक्षित आणि वेदनारहित उपचारांसाठी ही सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नक्की वाचा : भंडारदराला जाण्यासाठीच्या वाहतुकीत बदल

आधुनिक उपकरणांची उपलब्धता

काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने महिला व बाल रुग्णांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेतून मोफत शस्त्रक्रिया उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहेत. आता आरोग्य सेवेतील पुढचे पाऊल महानगरपालिकेने टाकले आहे. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या प्रयत्न व पुढाकारातून, तसेच आयडीबीआय बँकेकडून सीएसआर फंडाच्या माध्यमातून बाळासाहेब देशपांडे दवाखान्यात दुर्बीण द्वारे शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक एलईडी लाईट सोर्स, सीओटू इन्सुफ्लेटर, टेलिस्कोप, ट्रोकर सेट अशा आधुनिक उपकरणांची उपलब्धता झाली आहे.

अवश्य वाचा : महाराष्ट्रात होणार १५ हजार पोलिसांची भरती

आवश्यक स्त्रीरोग तज्ञ व सर्जन उपलब्ध (Free Laparoscopy Surgery)

या माध्यमातून बिनटाका स्त्री नसबंदी, गर्भपिशवी काढणे, अपेंडिक्स व पित्ताशय काढणे, वंध्यत्वासाठी गर्भाशय व नलिकेची तपासणी, तसेच इतर लॅप्रोस्कोपी ऑपरेशन्स केले जाणार आहेत. त्यासाठी आवश्यक डॉक्टर, स्त्रीरोग तज्ञ व सर्जन उपलब्ध आहेत. कमी टाक्यांत आणि अधिक कार्यक्षमतेने सेवा देण्याचा निर्धार या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे, असे महापालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

महापालिकेकडून शहरात बुरुडगाव रस्त्यावर नवीन अद्ययावत रुग्णालयाची इमारत उभी राहिली आहे. त्यातील फर्निचर व इतर कामे सुरू आहेत. सावेडी उपनगरातही रुग्णालयासाठी इमारत उपलब्ध झाली आहे. आरोग्यवर्धीनी केंद्र, आपला दवाखाना या माध्यमातून आरोग्य सेवा सुरू केली आहे.