Free Medical Camp : नगर : शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन (Shantikumarji Firodia Memorial Foundation) आणि द साल्वेशन आर्मी इव्हेंन्जलिन बूथ हॉस्पिटलचे आयुर्वेदिक न्यूरोथेरपी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने बूथ हॉस्पिटल (Booth Hospital) येथे २०,२१ व २२ जानेवारी या कालावधीत वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मोफत तीन दिवसीय महाशिबिराचे (Free Medical Camp) आयोजन केले आहे.
नक्की वाचा : अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनाची धडक ; धडकेत एक जखमी
नामवंत न्यूरोथेरपीस्ट उपस्थित (Free Medical Camp)
या शिबिरासाठी डॉ. मनोज शर्मा (राष्ट्रीय गुरु) न्यूरोथेरपीचे संस्थापक व त्यांचे भारतामधील नामवंत न्यूरोथेरपीस्ट हे उपस्थित राहून या शिबिरामध्ये आपले महत्वपूर्ण योगदान देणार आहेत. या मोफत शिबिरामध्ये सांधेदुखी, मानेचे दुखणे, कंबरदुखी, गुडघे दुखी, खुब्याचे दुखणे, पॅरालसिस, हाता पायाला मुंग्या येणे, सायटिका, तसेच मनके व सांध्याशी निगडित सर्व आजारांवर आयुर्वेदिक थेरपीद्वारे मोफत उपचार केले जातील. या महाशिबिराचा हेतू, संबंधित आजाराने पीडित असलेल्यांना विनाऔषध व विना ऑपरेशन आयुर्वेदिक थेरपीद्वारे उपचारचा मोफत लाभ देणे, प्रत्येकाला आरोग्याचे महत्व पटवून देणे आणि सांधेरोग व मणक्याच्या आजरांचे उपचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे असा आहे.
हे देखील वाचा : संक्रांतीच्या दिवशी चिकनच्या दुकानात वाद; युवकाचा खून
नरेंद्र फिरोदियांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन (Free Medical Camp)
या शिबिराचे उद्घाटन नगर शहराचे प्रतिष्ठित समाजसेवी उद्योजक तथा शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनचे मुख्य विश्वस्त (चिफ ट्रस्टी) नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी न्यूरोफिजिशियन डॉ. राहुल धूत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हे संपूर्ण शिबिर बूथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे आणि डॉ. अकबर मणियार यांच्या मार्गदर्शनामध्ये होणार आहे.
त्याच प्रमाणे या तीन दिवसीय शिबिरात जनरल फिजिशियन डॉ. सोमेश्वर गायकवाड (एम डी मेडिसीन), स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. प्रियंका शर्मा व दंतरोग तज्ज्ञ डॉ. ममता कांबळे, डॉ. आशपाक पटेल (एम डी मेडिसीन) ह्या बूथ हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे, त्यामुळे गरजू रुग्णांनी याचाही लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
शिबिरात नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क – सुरज वंजारे 9834673093, प्रवीण साबळे 92700708461, अमित पठारे 89753722