
नगर: शालेय विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी (Good news for school students)आहे. महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना (Students from 1st to 8th grade) मोफत शालेय दप्तर (Free School Bags to Students) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून (School Education and Sports Department) शुक्रवारी(ता.१३) हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
नक्की वाचा: डोळ्यांनी अंध असली तरी ‘ती’ देणार डोळस न्याय!थान्या नाथन नेमक्या कोण ?
योजनेचा हेतू काय ? (Free School Bags to Students)

शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांचा शैक्षणिक खर्चाचा भार कमी करणे, शाळेत नियमित उपस्थिती वाढवणे, तसेच ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना शिक्षणात टिकवून ठेवणे, हा या योजनेमागील मुख्य हेतू असल्याचे या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. तर दुसरीकडे मुंबई सारख्या ज्या महापालिकेच्या शाळांमध्ये याआधीपासूनच मोफत दप्तराची सुविधा देण्यात येत होते, त्या शाळांना यातून वगळण्यात आले आहे.
अवश्य वाचा: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात सहा आरोपींवर आरोप निश्चित;खटल्याची सुनावणी कधी?
सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपायोजना राबविण्यात येतात. तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन शासन विविध चांगल्या योजना आधीपासून राबवत आहे. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, दोन गणवेश, मध्यान्ह भोजन योजना, शैक्षणिक साहित्य तसेच इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या सर्व योजनांना पूरक म्हणून आता मोफत दप्तर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य एकत्रित स्वरूपात मिळणार आहे.
१६५ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता (Free School Bags to Students)
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने सुमारे १६५ कोटी इतक्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. हा निधी शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत वितरित केला जाणार आहे. दप्तर खरेदी प्रक्रिया शासनाच्या प्रचलित नियमांनुसार, पारदर्शक पद्धतीने राबविली जाणार आहे. तसेच शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावरून संपूर्ण अंमलबजावणी केली जाईल.


