Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत सहभागासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत सहभागासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

0
Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत सहभागासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत सहभागासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Fruit Crop Insurance : नगर : पुनर्रचित हवामानावर (Weather) आधारित फळपिक विमा योजना मृग व आंबिया बहारमध्ये राबविण्यात येते. सन २०२५-२६ मधील आंबिया बहारमध्ये आंबा, संत्रा व काजू या पिकांसाठी विमा योजनेत सहभागासाठी ता. १५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी फळपीक विमा योजनेत (Fruit Crop Insurance) सहभागी होण्याचे आवाहन कृषी आयुक्तालयाच्या (Agricultural Commissionerate) मुख्य सांख्यिक प्रिती रोडगे यांनी केले आहे.

अवश्य वाचा: ऊसतोड कामगार महिलेची रस्त्यातच प्रसुती; जेऊर परिसरात घडली घटना

शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन (Fruit Crop Insurance)

आंबिया बहारमध्ये आंबा पिकासाठी रायगड, पालघर, ठाणे व नाशिक या जिल्ह्यांसाठी, काजूसाठी नाशिक, रायगड, पालघर, ठाणे तर संत्रा पिकासाठी जालना, अमरावती, अकोला, नागपूर, परभणी, पुणे, बुलढाणा, अहिल्यानगर,बीड व वाशिम जिल्ह्यांना फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ अंतिम मुदत होती. परंतू विमा पोर्टलवर तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता आले नाही. त्यामुळे मुदतवाढीच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली असून या संधीचा आंबा, संत्रा व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.