Waqf Board Grant: वक्फ बोर्डाला (Waqf Board) पायाभूत सुविधांसाठी तसेच बळकटीकरणासाठी १० कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकांपुर्वी (Vidhansabha Election) राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता. मात्र, काल (ता.२८) जीआर (GR) काढण्यात आला आहे. राज्य सरकारने राज्य वक्फ बोर्डाला वेगवेगळ्या पायाभूत सुविधांसाठी १० कोटी रुपये निधी जाहीर केला आहे.अल्पसंख्यांक विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.
नक्की वाचा : ‘देशात पेट्रोलऐवजी बायोइथेनॉलवर वाहने धावणार’-नितीन गडकरी
दोन कोटी अनुदान वक्फ बोर्डाला वितरित (Waqf Board Grant)
शासन निर्णयामध्ये दिलेल्या माहितीनुसार,२०२४- २५ वर्षात अर्थसंकल्पीय अंदाज आणि पुरवणी मागणीद्वारे एकूण २० कोटी एवढी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामधून दोन कोटी अनुदान वक्फ बोर्डाला वितरित करण्यात आले आहे. तर आता १० कोटी रुपये अदा करण्यात येणार आहेत. वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी हा निधी देण्यात येणार आहे.
अवश्य वाचा : ‘खाशाबा’चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये काय म्हणाले? (Waqf Board Grant)
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवर पोस्ट करुन या निर्णयाबाबत भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, वफ्क बोर्डाला निधी दिल्याची बातमी सध्या सुरू आहे. सध्या महाराष्ट्रात काळजीवाहू सरकार आहे.या सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसतो.फक्त तातडीने काही आपत्कालीन निर्णय घ्यावे लागले तरच करता येतात. निधी बाबतचा निर्णय प्रशासकीय पातळीवरून घेतला गेला असे दिसते. त्यामुळं प्रशासन आपल्या निर्णयात दुरुस्ती करेल, अशी आशा आहे,असं केशव उपाध्ये म्हणाले.