Funeral : अन्यथा पुढील अंत्यविधी कर्जत तहसील कार्यालयासमोर

Funeral : अन्यथा पुढील अंत्यविधी कर्जत तहसील कार्यालयासमोर

0
Funeral : अन्यथा पुढील अंत्यविधी कर्जत तहसील कार्यालयासमोर
Funeral : अन्यथा पुढील अंत्यविधी कर्जत तहसील कार्यालयासमोर

Funeral : कर्जत : दलित स्मशानभूमीतील अतिक्रमण (Encroachment) तत्काळ न काढल्यास यापुढील अंत्यविधी (Funeral) कर्जत तहसील कार्यालयाच्या समोर करण्यात येईल, असा इशारा (Warning) नगरसेवक भास्कर भैलुमे यांच्यासह बारडगाव सुद्रिकच्या नागरिकांनी दिला आहे.

अवश्य वाचा : अन्यथा पुढील अंत्यविधी कर्जत तहसील कार्यालयासमोर

दलित समाजाची ११ गुठ्यांत स्मशानभूमी

बारडगाव सुद्रिक (ता.कर्जत) येथील पिढ्यानपिढ्या असलेली दलित समाजाची स्मशानभूमी ११ गुठ्यांत आहे. अनेक वर्षांपासून सदरच्या जागेवरच दलित समाज बांधवाचा अंत्यविधी बौद्ध धर्माच्या संस्कारातून त्याच ठिकाणी होत आहे. मात्र, दलित समाजाच्या ताब्यात असलेल्या गट नंबर १७३ व जुना सर्वे नंबर १ मधील ११ गुंठ्यातील काही भागात बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आले. याबाबत सर्व समाज बांधवानी वेळोवेळी अनधिकृत अतिक्रमणाची तक्रार संबंधित गावपातळीवरील अधिकारी यांच्याकडे तोंडी व लेखी स्वरूपात दाखल केली होती. मात्र, आजमितीस देखील यावर कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही.

नक्की वाचा : श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन

बेकायदेशीर अतिक्रमण तात्काळ काढण्याची मागणी (Funeral)

ज्या इसमाने दलित समाजाच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण केले आहे, तो वेळ काढत केलेले अनधिकृत अतिक्रमण  काढतो- काढतो असे म्हणत प्रशासनासह दलित बांधवांची दिशाभूल करीत आहे. या अतिक्रमणामुळे अंत्यसंस्कार करताना खुप अडचणी आणि समस्यांचा सामना बारडगाव सुद्रिकच्या ग्रामस्थांना होत आहे. केवळ स्वत:च्या फायद्यासाठी दलित समाज बांधवाना वेठीस धरण्याचे काम सदरचा इसम करीत असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच स्मशानभूमीतील बेकायदेशीर केलेले अतिक्रमण तात्काळ काढावे आणि समाज बांधवास न्याय द्यावा, या मागणीचे निवेदन कर्जत तहसीलदार यांना देण्यात आले.

यावेळी नगरसेवक भास्कर भैलुमेसह, नाना साबळे आदी भीमसैनिक उपस्थित होते. अनेक दिवसांपासून बारडगाव सुद्रीक येथील दलित बांधवाच्या स्मशानभूमीत अतिक्रमण करण्यात आले आहे. याबाबत प्रशासनाकडे न्याय मागण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र, ते आजमितीस कायम आहे. ३० जून अखेर सदरचे अनधिकृत अतिक्रमण तालुका प्रशासनाने न काढल्यास १ जुलै रोजी कर्जत तहसील कार्यालयात आमरण उपोषण करण्यात येईल. तसेच यापुढील अंत्यविधी कर्जत तहसील कार्यालयाच्या आवारातच करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक भास्कर भैलुमे यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here