Funeral : श्रीगोंदा : तालुक्याचे भूमिपुत्र मेजर अशोक नामदेव सातव (नाईक) दिल्ली (Delhi) येथे ऐ. एम.सी बेस हॉस्पिटल येथे शनिवारी (ता.१७) कर्तव्य बजावत असताना शहीद (Shaheed) झाले होते. त्यांचा अंत्यविधी (Funeral) शासकीय इतमामात सोमवारी (ता.१९) अरणगाव दुमाला सातववाडी येथे पार पडला. शहीद मेजर अशोक नामदेव सातव हे भारतीय सैन्य दलामध्ये (Indian Army) आर्मी मेडिकल कोर रेजिमेंट मध्ये कार्यरत होते.
नक्की वाचा: धक्कादायक! बदलापूरच्या शाळेत चार वर्षांच्या चिमुकल्यांवर अत्याचार
जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सैनिक संघटना उपस्थित (Funeral)
त्यांनी जम्मू काश्मीर, उधमपूर, दिल्ली, आसाम इत्यादी ठिकाणी वीस वर्षे देशसेवा केली होती. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, सहा वर्षाची एक मुलगी, एक भाऊ, दोन बहिण, दोन चुलते, चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांचे वडील व भाऊ हे सुद्धा माजी सैनिक आहेत. शहीद मेजर अशोक सातव हे ढवळगावचे सामाजिक कार्यकर्ते नामदेव ढवळे यांचे जावई होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी श्रीगोंदा, पारनेर, कर्जत- जामखेड, शिरूर तालुक्यासह पुणे व अहमदनगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने त्रिदल आजी माजी सैनिक संघटना उपस्थित होत्या.
अवश्य वाचा: जखणगाव अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
आर्मी जवानांकडून हवेत फैरी झाडून मानवंदना (Funeral)
शहीद मेजर अशोक सातव यांचे पार्थिव आर्मीच्या वाहनातून ढवळगाव येथे आणण्यात आले. यावेळी नागरिकांनी भारत माता की जय, वंदे मातरम, अमर रहे, वीर जवान अमर रहे या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. ढवळगाव येथून शहीद सातव यांच्या अंत्ययात्रेला सुरवात झाली. फुलांनी सजवलेल्या टेम्पोमधून अंत्ययात्रा काढण्यात आली. श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांनी अंत्ययात्रेसाठी गर्दी केली होती. यानंतर अरणगाव दुमाला येथील सातववाडी येथील घरी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. आर्मीच्या जवानांनी हवेत फैरी झाडून मानवंदना दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी आमदार बबनराव पाचपुते, तहसीलदार क्षितिजा वाघमारे, नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार, माजी आमदार राहुल जगताप , श्रीनिवास नाईक , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे, महाराष्ट्र राज्य त्रिदल आजी माजी सैनिक संघटना तसेच ग्रामस्थ व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.