Funeral : मेल्यानंतरही मरण यातना; भर पावसात ताडपत्री धरून अंत्यसंस्कार!

Funeral

0
Funeral : मेल्यानंतरही मरण यातना; भर पावसात ताडपत्री धरून अंत्यसंस्कार!
Funeral : मेल्यानंतरही मरण यातना; भर पावसात ताडपत्री धरून अंत्यसंस्कार!

Funeral : शेवगाव : तालुक्यातील तालुक्यातील नागलवाडी येथे स्मशानभूमी (Cemetery) नसल्यामुळे भर पावसात महिलेचा अंत्यविधी करण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली. अखेर प्रेतावर (Dead Body) ताडपत्री धरून अंत्यसंस्कार (Funeral) करावे लागले.

नक्की वाचा : तामिळनाडूमध्ये ७२ टक्के आरक्षण होऊ शकते,तर महाराष्ट्रात का नाही ?- शरद पवार

नागरिकांमध्ये प्रशासनाच्या विरोधात प्रचंड चीड

अत्यंत डोंगर माथ्यावर दुर्गम भागातील असलेल्या नागलवाडी येथे एका महिलेचे निधन झाले. गावात स्मशानभूमीची व्यवस्था नसल्यामुळे नातेवाईक व ग्रामस्थांना उघड्यावर अंत्यविधी करावा लागला. पण जोरदार पावसामुळे मृतदेहाची हेळसांड होऊन ग्रामस्थ व नागरिकांना भर पावसात ताडपत्री धरून मृतदेहाचा अंत्यविधी करावा लागला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाच्या विरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे.

आवश्य वाचा : सोनू सूद करणार स्टार प्लसच्या नवीन शो ‘संपूर्णा’चा ट्रेलर लॉन्च

गावकऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा (Funeral)

नागलवाडी या गावामध्ये कोणत्याही समाजाला स्मशानभूमीची व्यवस्था नसल्याकारणाने पूर्ण गावाला नैसर्गिक संकटाच्या काळात अंत्यविधीसाठी मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. याकडे पहायला मात्र प्रशासनाला व अधिकाऱ्यांना मात्र वेळ नाही. असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील स्मशानभूमीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अन्यथा गावकऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गावातील नागरिकांनी दिला आहे.