G S Mahanagar Co-op Bank : नगर : जी. एस. महानगर बँक (G S Mahanagar Co-op Bank) सॉलिसिटर गुलाबराव शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभी केली आहे. या बँकेच्या निवडणुकीचा (Election) प्रचार करताना सर्वसामान्य सभासदांनी सॉ. गुलाबराव शेळके (Gulabrao Shelke) व उदय शेळके यांच्या आठवणी जागवल्या. आपल्याला ही बँक टिकवायची आहे. बँकेला गतवैभव मिळवून द्यायचे आहे, असा विश्वास सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलच्या प्रमुख गीतांजली उदयदादा शेळके (Gitanjali Uday Shelke) यांनी व्यक्त केला..
अवश्य वाचा : संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे : डॉ. पंकज आशिया
महानगर बँकेची निवडणूक आली रंगात
जी. एस. महानगर सहकारी बँकेची निवडणूक ऐन रंगात आली आहे. सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलतर्फे प्रचार सुरू झाला आहे. पॅनलच्या प्रमुख गीतांजली उदयदादा शेळके यांनी उमेदवारांसह मुंबईतील लालबाग मार्केट परिसरात बँकेच्या सर्वसामान्य सभासदांच्या गाठीभेटी घेत प्रचार सुरू केला. या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सभागृह नेते रवींद्र इथापे, ज्येष्ठ संचालक भास्कर खोसे, बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष भास्कर कवाद, का. संचालक कांचन, माजी संचालक महादेव वराळ, माजी नगराध्यक्ष दत्ता कुलट, तुकाराम कदम, नितीन चिकणे, बाळा खणकर, बाळासाहेब बोरकर आदी उपस्थित होते. बँकेतील १९ संचालकांच्या जागांपैकी एक जागा बिनविरोध निवडून आली आहे. ही बिनविरोध जागा सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलची आहे. उर्वरित १८ जागांसाठी निवडणूक होत आहे. १ जून रोजी या निवडणुकीतील मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यादृष्टीने सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलने प्रचाराचा धडाका लावला आहे.
नक्की वाचा : राज्यातील जमिनींची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या २०० रुपयांत होणार; चंद्रशेखर बावनकुळे
गीतांजली शेळके म्हणाल्या की, (G S Mahanagar Co-op Bank)
सॉ. गुलाबराव शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी १९७३ साली दहा रुपयांच्या ठेवी गोळा करत महानगर बँकेची स्थापना केली. पूर्वी या बँकेचे अहमदनगर को-ऑपरेटिव्ह बँक असे नाव होते. नंतर या बँकेचे नाव महानगर को-ऑपरेटिव्ह बँक असे नामकरण करण्यात आले. पुढे उदयदादा शेळके यांनी या बँकेचे जी.एस. महानगर को-ऑपरेटिव्ह बँक असे नामांतर केले. छोटे-मोठे उद्योग करणारे अनेक जण या बँकेमुळे तसेच सॉ. गुलाबराव शेळके व उदयदादा शेळके यांच्या सहकार्याने कोट्याधीश झाले आहेत. आम्ही लालबाग मधील सर्वसामान्य सभासदांना भेटलो. प्रत्येक सभासदाला भेटताना त्यांच्याकडून सॉ. गुलाबराव शेळके व उदयदादा शेळके यांची आठवण निघत होती. ही बँक आपल्याला नुसती टिकवायचीच नाही तर या बँकेला गतवैभव मिळवून द्यायचे आहे. त्यासाठी सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलला सर्व मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन गीतांजली शेळके यांनी केले.