G S Mahanagar Co-op Bank : शेळके कुटुंबातील राजकीय संघर्षात कोणाला मिळणार बँकेच्या अध्यक्षपदाची खुर्ची?

G S Mahanagar Co-op Bank : शेळके कुटुंबातील राजकीय संघर्षात कोणाला मिळणार बँकेच्या अध्यक्षपदाची खुर्ची?

0
G S Mahanagar Co-op Bank : शेळके कुटुंबातील राजकीय संघर्षात कोणाला मिळणार बँकेच्या अध्यक्षपदाची खुर्ची?
G S Mahanagar Co-op Bank : शेळके कुटुंबातील राजकीय संघर्षात कोणाला मिळणार बँकेच्या अध्यक्षपदाची खुर्ची?

G S Mahanagar Co-op Bank : सॉलिसिटर दिवंगत गुलाबराव शेळके (Gulabrao Shelke) यांनी स्थापन केलेल्या जी एस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेची (G S Mahanagar Co-op Bank) निवडणूक सुरू झाली आहे. या निवडणुकीत (Election) दिवंगत उदय शेळके यांच्या पत्नी गीतांजली शेळके (Gitanjali Uday Shelke) यांच्या सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनल तसेच गीतांजली शेळके यांच्या नणंद स्मिता पटेल उर्फ स्मिता शेळके यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे. दरम्यान या बँकेचे (Bank) इतिहास काय आहे? व निवडणुकींमधील ही लढत कशी असणार आहे याबाबत आपण जाणून घेऊ.

अवश्य वाचा : संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे : डॉ. पंकज आशिया

बँकेच्या राज्यभरात १५० हून अधिक शाखा

सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांनी जीवनभर ग्रामीण तरुणांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या उच्च शिक्षणाच्या सुविधांसाठी प्रयत्न केले. सहकार चळवळीच्या माध्यमातून त्यांनी गरीब आणि गरजू लोकांना आर्थिक आधार दिला. सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांनी ‘जी. एस. बँके’ची सुरुवात केली होती. पारनेर तालुक्यापासून सुरूवात केलेल्या या बँकेचं मुख्यालय मुंबईत आहे आणि आज ह्या बँकेच्या राज्यभरात १५० हून अधिक शाखा आहेत. भारतातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँक म्हणून बँकेचा उल्लेख आहे. सुरवातीला या बँकेला अहमदनगर सहकारी बँक असे नाव होते. पुढे गुलाबराव शेळकेंनी या बँकेचे नाव महानगर बँक केले. महानगर बँक ही पारनेर तालुक्याची कामधेनू आहे. अनेक उद्योजक या बँकेने उभे केले आहेत. जीएस महानगर बँकेचा 1973 साली सुरू झालेला हा प्रवास एका छोट्याशा 9 बाय 18 चौरस फूट खोलीतून सुरु झाला. पुढे गुलाबराव शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम केल्याने ही बँक नावारूपाला आली.   

नक्की वाचा : राज्यातील जमिनींची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या २०० रुपयांत होणार; चंद्रशेखर बावनकुळे

ग्रामीण तरुणांची उन्नती आणि उच्च शिक्षणासाठी जीवन समर्पित (G S Mahanagar Co-op Bank)

त्यांच्या निधनानंतर बँकेची सूत्रे त्यांचे पूत्र उदय शेळके यांच्याकडे आली. त्यांनी या बँकेचे जी एस महानगर बँक असे नामांतर केले. त्यांनी आपल्या व्यावसायिक जीवनाला गंभीरपणे घेतलं. त्यांच्याकडे काम अचूक आणि पारदर्शक करण्याचं कौशल्य होतं. वडील सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांनी ग्रामीण तरुणांची उन्नती आणि उच्च शिक्षणासाठी जीवन समर्पित केले होते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून, ॲड.उदय गुलाबराव शेळके यांनी समाजासाठी अनेक उपक्रमांतून उत्कृष्ट कामगिरी बजावली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जीएस महानगर बँक या दोन बँकांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली होती. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत उदय शेळके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर गीतांजली शेळके यांची बिनविरोध निवड झाली. त्या जी एस महानगर बँकेच्या संचालिकाही आहेत. त्यामुळे त्यांना राजकीय व सामाजिक वर्तुळात गुलाबराव शेळके व उदय शेळके यांच उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे.

G S Mahanagar Co-op Bank : शेळके कुटुंबातील राजकीय संघर्षात कोणाला मिळणार बँकेच्या अध्यक्षपदाची खुर्ची?
G S Mahanagar Co-op Bank : शेळके कुटुंबातील राजकीय संघर्षात कोणाला मिळणार बँकेच्या अध्यक्षपदाची खुर्ची?

मुंबईतील जी. एस. महानगर बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. मुंबईचे जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी नितीन काळे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. संचालकपदाच्या १९ जागांपैकी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील जागेवर सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलचे संतोष रणदिवे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित १८ जागांसाठी १ जूनला मतदान घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये नणंद विरुद्ध सून अशी लढत होणार आहे. 

जी एस महानगर बँकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके व माजी अध्यक्ष उदय शेळके यांनी बँकेला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले. मात्र, दोघांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पश्च्यात कुटुंबातील कलह याचा परिणाम बँकेवर होऊ लागला. गुलाबराव यांच्या पत्नी सुमन शेळके या बँकेच्या अध्यक्षा आहेत तर त्यांची मुलगी स्मिता पटेल उर्फ स्मिता शेळके व सुनबाई गीतांजली शेळके या दोघी संचालिका आहे. उदय शेळके यांच्या निधनानंतर गीतांजली शेळके यांनी बँकेच्या वृद्धीसाठी प्रयत्न सुरु ठेवले. मात्र, बँकेच्या या व्यवहारामध्ये कौटुंबिक नातं हे अडचणीचं ठरू लागलं. नणंद -भावजई यांचे सूत काही जुळून येईना व मुलीच्या हट्टापायी सुमन शेळके यांना देखील काही बोलता येईना असे चित्र निर्माण झाले. स्मिता पटेल यांच्या स्वभावापुढे सुमन शेळके यादेखील हतबल झालेल्या दिसतात. जसे की गीतांजली शेळके व सुमन शेळके यांची इच्छा होती की बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी परंतु स्मिता पटेल यांचा त्याला तीव्र विरोध असल्यामुळे सभासदांवर निवडणूक लादली गेली.

गुलाबराव व उदय यांच्या मृत्यूंनंतर बँकेमध्ये सुमन शेळके यांच्या कन्या स्मिता पटेल उर्फ स्मिता शेळके यांचा हस्तक्षेप खूप वाढला. सुमन शेळके यांना सर्वोच्च अधिकार असतानांही स्मिता यांच्या जाचक धोरणात्मक निर्णयांमुळे बँकेमध्ये अस्थिरता वाढली व गीतांजली शेळके यांनी देखील याकडे कानाडोळा करण्यास सुरुवात केली. बँकेच्या महत्त्वाच्या कमिट्यांमधून गीतांजली शेळके यांना हटवण्यात आले. अशाप्रकारे निर्णयात्मक गोष्टींमध्ये गीतांजली शेळके यांना डावलण्यात येऊ लागल्याने व “मेरी सुनो” कारभाराने बँकेचे इतर संचालक देखील नाराज होते. अखेर निवडणुकीचे बिगुल वाजले आणि स्मिता पटेल यांनी आपल्या आईंना पुढे करून, म्हणजे बँकेच्या अध्यक्षा सुमन गुलाबराव शेळके यांच्या नेतृत्वाखाली ” संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके व सुमन गुलाबराव शेळके ” पॅनल ” उभा केला. वास्तविक पाहता मागील दोन वर्ष बँकेचा सर्व कारभार स्मिता पाटील ह्याच बघत होत्या. गीतांजली शेळके यांनी सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक असा पॅनल उभा केला. 

दोन पॅनलमध्ये होणाऱ्या या लढतीमध्ये गीतांजली यांची बाजू भक्कम असल्याचे अधोरेखित होत आहे. स्मिता यांचा एककल्ली कारभार व त्यांच्याकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक याला कर्मचारी व अधिकारी वर्ग कंटाळले आहेत. त्यातच स्मिता यांच्या कार्यपद्धतीमुळे बँकेचा मागील वर्षातील आलेख देखील खालवलेला आहे. तर गीतांजली यांच्या बाजूने पूर्वीच्या संचालक मंडळातील बहुसंख्येने संचालक जसे की भास्कर कवाद,सचिन आडसूळ, बबन लंके, विलास पालवे, श्रीधर कोठावळे यासारखे ज्येष्ठ व अनुभवी संचालक असल्याने त्यांचे पारडे निवडणुकीत भारी ठरते असे दिसते आहे. यातच त्यांच्या पॅनलने एक बिनविरोध जागा जिंकून आपल्या विजयाचे खाते उघडले आहे. स्मिता पटेल यांचा पॅनल देखील पूर्ण झालेला नाही. गीतांजली शेळके या बँकेचे नेतृत्व चांगल्या प्रकारे करू शकतात अशी चर्चा सभासदांमध्ये असल्याने कोणाला साथ मिळणार हे पाहणे महत्वाचे आहे.