G S Mahanagar Co-op Bank : श्रीमती गीतांजली उदय शेळके यांच्या सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलने उडवला प्रचाराचा धुरळा

G S Mahanagar Co-op Bank : श्रीमती गीतांजली उदय शेळके यांच्या सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलने उडवला प्रचाराचा धुरळा

0

G S Mahanagar Co-op Bank : नगर : राज्यातील नावाजलेली सहकारी बँक म्हणून ओळख असलेल्या जी. एस. महानगर सहकारी बँकेची (G S Mahanagar Co-op Bank) निवडणूक (Election) आता ऐन रंगात आली आहे. या निवडणुकीत नणंद-भावजयीच्या सत्तासंघर्षात गीतांजली उदय शेळके (Gitanjali Uday Shelke) यांच्या सॉ. गुलाबराव शेळके (Gulabrao Shelke) संस्थापक पॅनलने प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. या निवडणुकीच्या सुरुवातीलाच एक जागा बिनविरोध जिंकल्याने या पॅनलचा विजयाचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला असल्याची चर्चा आहे.

G S Mahanagar Co-op Bank : श्रीमती गीतांजली उदय शेळके यांच्या सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलने उडवला प्रचाराचा धुरळा
G S Mahanagar Co-op Bank : श्रीमती गीतांजली उदय शेळके यांच्या सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलने उडवला प्रचाराचा धुरळा

अवश्य वाचा : मुंबईनंतर पुणे व सोलापूर मध्ये मान्सूनची एन्ट्री!

पार्श्वभूमी आणि पॅनेलची ताकद

दिवंगत स्वर्गीय गुलाबराव शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या या बँकेच्या राज्यभरात ७० हून अधिक शाखा आहेत. मुंबईतील जी. एस. महानगर बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. मुंबईचे जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी नितीन काळे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. संचालकपदाच्या १९ जागांपैकी अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील जागेवर स्व. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनेलचे संतोष रणदिवे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित १८ जागांसाठी १ जून रोजी मतदान घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये नणंद विरुद्ध सून अशी थेट लढत होणार आहे. सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनेलमध्ये पूर्वीच्या संचालक मंडळातील बहुसंख्य संचालक जसे की, भास्कर कवाद, सचिन अडसूळ, बबन लंके, विलास पालवे, श्रीधर कोठावळे यांसारखे ज्येष्ठ व अनुभवी संचालक असल्याने त्यांचे पारडे निवडणुकीत जड ठरत असल्याचे दिसून येत आहे.

G S Mahanagar Co-op Bank : श्रीमती गीतांजली उदय शेळके यांच्या सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलने उडवला प्रचाराचा धुरळा
G S Mahanagar Co-op Bank : श्रीमती गीतांजली उदय शेळके यांच्या सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलने उडवला प्रचाराचा धुरळा

नक्की वाचा : संजय शिरसाट यांच्या मुलावर विवाहित महिलेचे गंभीर आरोप

प्रचार दौरा आणि मिळणारा पाठिंबा (G S Mahanagar Co-op Bank)

गीतांजली शेळके यांनी त्यांच्या पॅनेलमध्ये अनुभवी संचालकांना बरोबर घेत पारनेर तालुका, पुणे येथील निगडी, ससून, मुंबईतील नेरुळ, कामाठी, लालबाग, कॉटन ग्रीन, रायगड जिल्ह्यातील कळंबोली आदी ठिकाणी प्रचार सभा व उमेदवारांच्या गाठीभेटीचा धडाका लावला आहे. उद्या (गुरुवार, ता. २९ मे) सकाळी १० वाजता पारनेर येथे पॅनेलची मोठी प्रचारसभा होणार आहे. गीतांजली शेळके यांच्या प्रचारसभा व सभासदांच्या भेटींना मिळणाऱ्या प्रतिसादातून सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनेल १ जूननंतर विजयी गुलाल खेळणार असल्याचे सांगितले जात आहे.

G S Mahanagar Co-op Bank : श्रीमती गीतांजली उदय शेळके यांच्या सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलने उडवला प्रचाराचा धुरळा
G S Mahanagar Co-op Bank : श्रीमती गीतांजली उदय शेळके यांच्या सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलने उडवला प्रचाराचा धुरळा

बँकेमध्ये संचालिका पदावर काम करत असताना गीतांजली शेळके यांनी उत्कृष्ट काम केले आहे आणि त्या एडीसीसी बँकेच्या विद्यमान संचालिका देखील आहेत. तसेच उदय गुलाबराव शेळके यांच्या निधनानंतर उत्तराधिकारी म्हणून त्यांना राजकीय पाठिंबा देखील मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने पवार कुटुंब हे अग्रस्थानी आहे. त्यांच्या पाठोपाठ आमदार महेश लांडगे, आमदार काशिनाथ दाते, खासदार निलेश लंके, पुण्याचे माजी महापौर राहुल जाधव, माजी केंद्रीय मंत्री आनंदराव आडसूळ, आमदार प्रवीण दरेकर, माजी आमदार बाळाराम पाटील, आमदार बापूसाहेब पठारे, दिवंगत उदयदादा शेळके यांचे मामा विठ्ठल गुंजाळ व उदयदादा शेळके यांचे आतेभाऊ श्रीधर कोठावळे, डॉ. श्रीकांत पठारे, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांच्यासह बँकिंग क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांचा गीतांजली शेळके यांना पाठिंबा असल्याने विजयाची वाट त्यांच्यासाठी सुकर होताना दिसत आहे.