Gadchiroli : नगर : गडचिरोलीतील (Gadchiroli) आदिवासी भागात राहणाऱ्या दोन मुलांना प्रशासनाच्या (Administration) नाकर्तेपमुळे जीव गमवावा लागला आहे. तापाने (Fever) फणफणलेल्या या दोन मुलांना रस्ता नसल्याने दवाखान्यात नेण्यास ॲम्बुलन्स (Ambulance) नसल्याने जीव गेला. त्यातच दोन्ही मुलांचे मृतदेह (Dead Body) खांद्यावर टाकून मुलांच्या आई वडिलांना चिखलातून १५ किलोमीटरची पायपीट करावी लागली आहे. या दुर्दैवी घडनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा: मद्यधुंद पोलीस उपनिरीक्षकाकडून वृत्तपत्र छायाचित्रकारास मारहाण; पोलीस अधीक्षकांना निवेदन
पक्का रस्ताच नसल्याने ॲम्बुलन्स नाही
आजोळी गेलेल्या दोन मुलांच्या अंगात अचानक ताप भरला. तातडीने उपचार म्हणून गावातीलच पुजाऱ्याकडे या मुलांना जडीबुटी देण्यात आली होती. त्याचा मुलांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झाली नाही. मुलांना सरकारी दवाखान्यात न्यायचे तर पक्का रस्ताच नसल्याने ॲम्बुलन्स नाही, दुसरे वाहन नाही. पण दुर्गम भागातील जिणे नशीबी आल्याने या दोघांना वाचवता आले नाही. मुलांचे दोन मृतदेह खांद्यावर घेऊन आई-वडीलांना चिखलातून १५ किलोमीटरची पायपीट करावी लागली. या दुर्दैवी घटनेवर प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अवश्य वाचा: मनसेच्या दोन गटात अमित ठाकरेंसमोरच वाद?
वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे या दोन चिमुकल्यांच्या मृत्यू (Gadchiroli)
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुका अंतर्गत येणाऱ्या “येर्रागड्डा” येथील रहिवासी रमेश वेलादी यांच्या मोठा मुलगा मोतीराम वेलादी सहा वर्ष व दिनेश वेलादी साडेतीन वर्ष या दोन मुलांना मोठा गंभीर ताप आला. एका पुजाऱ्यांकडून जडीबुटीची औषध देण्यात आली. परिस्थिती गंभीर झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे या दोन चिमुकल्यांच्या मृत्यू झाला. जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध असताना आरोग्य विभागाने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही. सध्या गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया आणि डेंगूचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे. या मुलांना मलेरिया झाल्याची प्राथमिक माहिती गावकऱ्यांनी दिली.
जिमलगटा येथे पोहोचल्यानंतर या दोन भावंडांच्या मृत्यू झाला. उपचारासाठी रुग्णवाहिका मागितली. रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे रागात पालकांनी मृतदेह खांद्यावर घेऊन १५ किलोमीटरचा प्रवास केला. या सर्व प्रकारामुळे आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एकीकडे आपण देशाच्या अमृत महोत्सव साजरा करीत असून या गंभीर प्रकरणावर जिल्हा परिषदेचा कोणती कारवाई करणार याकडे जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे.
या सर्व प्रकारानंतर आता आई-वडिलांवर हा प्रकार ढकलण्याचा प्रयत्न आरोग्य यंत्रणा करत असल्याचे समोर आले आहे. आई-वडिलांनी अगोदर पुजाऱ्याकडे उपचार केले आणि नंतर दवाखान्यात आणले. त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत आहे.