Game Development World Championship : नगर : स्ट्रक्ड थ्रीडी (Srucked 3D) गेम डेव्हलपमेंट चॅलेंज २०२५ (Game Development World Championship) ही स्पर्धा स्वित्झर्लंडस्थित (Switzerland) कंपनी स्ट्रक्ड थ्रीडी गेम क्रिएशन (Struckd – 3D Game Creator) प्लॅटफॉर्मने आयोजित केली होती. एकूण १२० देशांनी तीन लाख ६५ हजार संघांसह या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यापैकी अंतिम फेरीसाठी ६५ देश पात्र ठरले होते.
नक्की वाचा : आयुष्मान कार्ड योजनेचा कोणत्या रुग्णांना मिळणार फायदा ? जाणून घ्या सविस्तर…
भारत व चीनने ३१ हजार संघांचा सहभाग
भारत व चीनने ३१ हजार संघांसह समान संख्येने भाग घेतला होता. यामध्ये अहिल्यानगरच्या रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनच्या सेठ नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील गेम डेव्हलपमेंट स्पर्धेत सांघिक प्रथम क्रमांक पटकावला आहे.
अवश्य वाचा : “शिवसेना आजही आमचा मित्र पक्ष!मात्र”…;देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
कथेच्या आधारे खेळ डिझाइन (Game Development World Championship)
ही स्पर्धा एक कथा विकसित करण्यासाठी आणि कथेच्या आधारे एक खेळ डिझाइन करण्यासाठी होती. ज्यासाठी विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली व खेळ विकसित करण्यासाठी त्यांची प्रतिभा दाखवली आहे.
२५ एप्रिल रोजी शाळेच्या सरजुदेवी मानधना सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत संगणक गेम डेव्हलपमेंट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत आरुष बेडेकर (इयत्ता सातवी), आरोही बेडेकर, रोनक वाळुंज (इयत्ता आठवी), मनस्वी सोहोनी (इयत्ता सहावी) यांनी भाग घेतला होता. त्यांना त्याच शाळेतील नववी मधील विद्यार्थी इशान जाजू याने प्रशिक्षण दिले. तिथेच या सगळ्यांची टीम जमली आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. ईशान जाजू या विद्यार्थ्याने क्रोनो स्पेक्टर्स या संघाचे नेतृत्व केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा एक गेम या सगळ्यांच्या टीमने डेव्हलप केला. लाखो सहभागींमधून प्रथम क्रमांक पटकावला. अहिल्यानगर शहरातील ही आजपर्यंतची कदाचित पहिलीच घटना असावी.
या सहभागींना सुवर्ण प्रमाणपत्रे, स्ट्रक्चर्ड थ्रीडी प्रो पॅकेजसाठी मोफत प्रवेश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोणत्याही तंत्रज्ञान स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्लॅटफॉर्म शुल्क मिळणार आहे.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्रीगोपाल धूत, उपाध्यक्ष मोहनलाल मानधना, राजेश झंवर, शाळा समितीचे अध्यक्ष नंदकुमार झंवर, सचिव शरद कोलते, शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका जेऊरकर, उपमुख्याध्यापिका गगन वाधवा, सेंटर ऑफ एक्सलॅन्सच्या इनचार्ज शिल्पा मुळे-दिवटे, यासह सर्व संचालक मंडळाने कौतुक केले आहे.