Ganapati : घरातील गणपती, महालक्ष्मी सजावट, किल्ला बनवा स्पर्धेचे बक्षीस वितरण

Ganapati : घरातील गणपती, महालक्ष्मी सजावट, किल्ला बनवा स्पर्धेचे बक्षीस वितरण

0
Ganapati : घरातील गणपती, महालक्ष्मी सजावट, किल्ला बनवा स्पर्धेचे बक्षीस वितरण
Ganapati : घरातील गणपती, महालक्ष्मी सजावट, किल्ला बनवा स्पर्धेचे बक्षीस वितरण

Ganapati : नगर : राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ (National Human Rights Protection Council) आयोजित घरातील गणपती (Ganapati), महालक्ष्मी सजावट आणि किल्ला बनवा स्पर्धेचे पारितोषिक वितरण गुरूपुष्यामृत योग साधून २१ नोव्हेंबरला करण्यात आले. संघाचे शहराध्यक्ष महेश गुगळे, उपाध्यक्ष वरद मुठाळ, नाथ संप्रदायाचे संशोधक मिलिंद चवंडके यांच्या हस्ते विजेत्यांना आकर्षक स्मृतीचिन्ह (Momento) देवून गौरविण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांनाही स्मृतीचिन्ह देण्यात आले.

Ganapati : घरातील गणपती, महालक्ष्मी सजावट, किल्ला बनवा स्पर्धेचे बक्षीस वितरण
Ganapati : घरातील गणपती, महालक्ष्मी सजावट, किल्ला बनवा स्पर्धेचे बक्षीस वितरण

अवश्य वाचा : राज्यात आम्हीच सत्ता स्थापन करणार आहोत : आमदार बच्चू कडू

मिलिंद चवंडके यांच्याकडे होती परीक्षणाची जबाबदारी

राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे अहिल्यानगर शहराध्यक्ष महेश गुगळे यांनी संघाचे प्रदेशाध्यक्ष संदीप लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर शहरातील गणेशोत्सवात घरातील गणपती सजावट आणि श्रीमहालक्ष्मी सजावट स्पर्धा घेण्यात आली. तसेच दीपावली उत्सवात किल्ला बनवा स्पर्धा घेतली. या तिन्हीही स्पर्धांना उत्तम प्रतिसाद लाभला, अशी माहिती दिली. सार्वजनिक गणेशोत्सवातील देखाव्यांचा आणि श्रीमहालक्ष्मी सजावट स्पर्धा परीक्षणाचा तब्बल दीड तपांचा अनुभव असलेले मिलिंद चवंडके यांच्याकडे परीक्षणाची जबाबदारी संघाने सोपवली होती. त्यांनी अत्यंत बारकाईने पहाणी करत निकाल तयार केले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे नियोजन संघाचे उपाध्यक्ष वरद मुठाळ यांनी केले होते.

Ganapati : घरातील गणपती, महालक्ष्मी सजावट, किल्ला बनवा स्पर्धेचे बक्षीस वितरण
Ganapati : घरातील गणपती, महालक्ष्मी सजावट, किल्ला बनवा स्पर्धेचे बक्षीस वितरण

नक्की वाचा : दहावीच्या परीक्षेत गणित,विज्ञानात उत्तीर्ण होण्यासाठी ‘इतके’ गुण आवश्यक

घरगुती गणपती सजावट स्पर्धा निकाल (Ganapati)

प्रथम क्रमांक – सुषमा वैद्य (अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती) 
व्दितीय क्रमांक – जान्हवी विवेक भंडारी (हस्तकलेचे दर्शन)
तृतीय क्रमांक – संगीता गुंफेकर (वाड्यातील गणेशोत्सव)
विशेष पारितोषिक – सोनल गणेश तरटे, पाईपलाईन रस्ता, (दगडूशेठ हलवाई गणेशमूर्ती), मनोज भाऊसाहेब शिंदे (पर्यावरण वाचवा संदेश).

महालक्ष्मी सजावट स्पर्धेचा निकाल 
प्रथम क्रमांक – प्राजक्ता सौरभ देशमुख ( गरूडारूढ महालक्ष्मी) नवीपेठ 
व्दितीय क्रमांक – शांता दत्तात्रय भागानगरे (राजस्थानी कलेचे दर्शन) रंगारगल्ली 
तृतीय क्रमांक – दीपाली विशाल दहिंडे (मंगळागौर) माळीवाडा
विशेष पारितोषिक – निलम राजेंद्र परदेशी (सूर्यरथ), सोनाली अशोक मासाळ, वैशाली रवी मासाळ (जुनं ते सोनं)

किल्ला बनवा स्पर्धा – 
प्रथम क्रमांक – प्रद्युम्न योगेश करांडे व श्रीयांस योगेश करांडे
द्वितीय क्रमांक – नवरंग व्यायाम शाळा 
तृतीय क्रमांक – मयुरेश ललित भूमकर