Ganesh Visarjan: आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. गणपती विसर्जन (Ganpati Visarjan) हे प्रत्येक ठिकाणी वेगवगेळ्या दिवशी केलं जात. मात्र गणपतीचं विसर्जन का करतात? ही विसर्जनाची प्रथा (The practice of immersion) कशी सुरू झाली? जाणून घेऊ …
गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनाची प्रथा महाभारत ग्रंथाच्या रचनेनंतर सुरु झाली आहे अशी पौराणिक मान्यता आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीच्या तेजाला शांत करण्यासाठी त्यांना पाण्यामध्ये सोडून स्नान घातलं जातं. त्यामुळे गणपती मूर्तीच्या प्रतिमेचं विसर्जन करण्याची प्रथा आहे.
नक्की वाचा :मराठा आरक्षणासाठीच्या नवीन जीआरनुसार कुणबी प्रमाणपत्र कुणाला मिळणार?
कथा नेमकी काय ? (Ganesh Visarjan)
धर्मग्रंथांनुसार, महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करण्याचा निर्णय घेतला. पण हे काम महर्षी व्यासांना जमणार नव्हतं. त्यामुळे त्यांनी भगवान श्री गणेशांची आराधना केली आणि त्यांना प्रार्थना केली की, त्यांनी या ग्रंथाच्या रचनेमध्ये आपल्याला मदत करावी. गणपतीने या गोष्टीला संमती दिली आणि रात्रंदिवस लिखाणाचं काम सुरू झालं. गणेश चतुर्थीच्या दिवसापासून जवळपास १० दिवस महर्षी व्यासांनी महाभारताची कथा सांगितली आणि ती गणपतीने लिहून काढली. महर्षी व्यास यांनी भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा आणि लिखाणाच्या कामाची सुरुवात केली. हे काम अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपलं. मात्र कथा सांगून झाल्यावर जेव्हा महर्षी व्यासांनी डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिलं की, खूप जास्त मेहनत केल्यामुळे गणपतीच्या शरीराचं तापमान वाढलेलं होतं. त्यामुळे गणपतीच्या शरीराचा दाह कमी करण्यासाठी महर्षी व्यास गणपतीला घेऊन सरोवरापाशी गेले आणि त्यांना स्नान घातलं. तेव्हापासून गणपती विसर्जनाची पद्धत सुरू झाली.
अवश्य वाचा : ओबीसी समाजासाठी उपसमिती नियुक्त; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
दुसरी मान्यता काय ? (Ganesh Visarjan)
दुसरं एक कारण असंही सांगितलं जातं की, पृथ्वीची प्रमुख पाच तत्वे आहेत, ज्यामध्ये पाणी या तत्त्वाचा अधिपती असं गणपतीचं वर्णन केलं जातं. त्यामुळे गणपतीला पाण्यामध्ये विसर्जित केलं जातं. धार्मिक ग्रंथांमध्ये असाही उल्लेख आढळतो की, सलग १० दिवस लिहित बसल्यामुळे गणपतीचं शरीर आखडलं होतं, त्यामुळे गणपतीचं आणखी एक नाव पार्थिव गणेशही पडलं…