Ganesha Idol : पारंपरिक गणेशमूर्तीना मोठी मागणी; गणपती मूर्ती निर्मितीत नगरच अव्वल  

Ganesha Idol : पारंपरिक गणेशमूर्तीना मोठी मागणी; गणपती मूर्ती निर्मितीत नगरच अव्वल  

0
Ganesha Idol : पारंपरिक गणेशमूर्तीना मोठी मागणी; गणपती मूर्ती निर्मितीत नगरच अव्वल  
Ganesha Idol : पारंपरिक गणेशमूर्तीना मोठी मागणी; गणपती मूर्ती निर्मितीत नगरच अव्वल  

Ganesha Idol : नगर : गणेशोत्सव (Ganeshotsav) जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतसे गणपती मूर्ती (Ganesha Idol) बनविण्याच्या कारखान्यातील लगबग वाढली आहे. आता मूर्तीच्या रंग कामांना वेग आला आहे. सालाबाद प्रमाणे यंदाही महापालिकेने मातीचे गणपती बनवा पीओपी गणपती टाळा, असे म्हणत गणपती कारखान्यांवर कारवाई (Action) करण्यास सुरुवात केली. विविध कारखान्याचे पंचनामे केले. मात्र, पालकमंत्र्याच्या मध्यस्थीनंतर या वादावर पडदा पडला आहे. त्यानंतर पीओपीच्या माध्यमातून गणपती तयार करण्याच्या कामाला वेग आला. आता हे काम मूर्त्या रंगवून अंतिम टप्प्यात आले आहे. कोविड नंतर यंदा प्रथमच या व्यवसायात स्थैर्य येत असल्याचे चित्र आहे.

नक्की वाचा : नवाब मलिक यांना कोर्टाचा दिलासा;वेेद्यकीय जामीन मंजूर

पारंपरिक गणपती मूर्तींना मोठी मागणी (Ganesha Idol)

यंदा पारंपरिक गणपती मूर्तींना मोठी मागणी असल्याने त्या  मूर्ती तयार केल्या जात आहे. त्यामध्ये मुंबईतील लालबागचा राजा, पुण्यातील दगडूशेठ हलवाई, तांबडी जोगेश्वरी, कसब्याचा राजा, चिंचपोकळीचा राजा, नालासोपारा अशा विविध गणपतीच्या मूर्ती आकाराला येऊ लागल्या  आहेत.  नगरची मूर्ती ही सुबक रंग कामातील असून रंगसंगतीतील सरसतेमुळे या व्यवसायातील अव्वल दर्जाचा क्रमांक आजही नगर शहराने टिकून ठेवला आहे. नगरमधील मूर्तींचे रंगकाम अत्यंत सुबक असल्याने येथील गणपती मूर्तीना मोठी मागणी असते. नगरच्या गणपतीची नक्कल अमरापूर, पेण येथेही रंग कामाच्या बाबतीत केली जाते. त्यामुळे नगरच्या मूर्तींना अमरापूर, पेण सह मुंबई, पुणे आणि परराज्यातून म्हणजेच मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात येथूनही वाढती मागणी आहे.

अवश्य वाचा : नगरमध्ये १२ ऑगस्ट रोजी धडकणार मराठ्यांचे वादळ; महाशांतता रॅलीची जय्यत तयारी सुरू

रामाच्या रूपातील गणपती मूर्तींना अधिक मागणी (Ganesha Idol)

यंदा रामाच्या रूपातील गणपती मूर्तींना अधिक मागणी आहे. त्यामधील विविध व्हरायटी तयार करण्यासाठी गणपतीची मूर्ती कलाकार सध्या राबत आहेत. अयोध्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर अशा मूर्ती स्थापन करण्याची यंदा टूम निघाली आहे. त्यामुळे रामाच्या रूपातील विविध गणपती मूर्तींना सध्या प्रचंड मागणी आहे. यंदा ड्रेपरीच्या गणपतींना ही चांगलीच मोठी मागणी आहे. धोतर, उपरणे आणि पगडीसह विविध प्रकारचे फेटे परिधान केलेल्या गणेश मूर्तीना विशेषत्वाने मागणी येत आहे. मुंबईतील विक्रेत्यांद्वारे परदेशातही नगरच्या गणपतीच्या मूर्ती जातात. यंदाही नगरच्या गणपती मूर्तींना परदेशातून या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून मागणी नोंदवली जात आहे. त्यासाठी वेगळ्या प्रकारचे पॅकिंग आवश्यक असते. त्यामुळे इथून मूर्ती मुंबईला पाठवली जाते व त्यानंतर पुढील सोपस्कारानंतर त्या परदेशात पाठवल्या जातात.

यंदा गणपती मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे भाव वाढल्याने प्लास्टर ऑफ पॅरिस, रंग, काथ्या आदीच्या दरांमध्ये १५-२० टक्क्याने वाढ झाली आहे. वाहतुकीचा दरही वाढला असल्याने यंदा गणपतीच्या मूर्तीही १५ ते २० टक्क्यांनी महागण्याची शक्यता आहे. 

शब्दांकन – देविप्रसाद अय्यंगार, नगर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here